'गॅस नाही, ढकला लग्न पुढे'! सिलेंडरटंचाईचा भलताच परिणाम; केटरर्स मिळत नसल्याने विवाहसोहळ्यांना फटका

LPG Gas Cylinder Shortage: फोंडा परिसरात काही विवाह सोहळे पुढे ढकलण्याची वेळ आली असून केटरर्स ऑर्डर घेण्यास नकार देत असल्याने वधू-वरांच्या कुटुंबीयांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
LPG Gas Cylinder
LPG Gas CylinderDainik Gomantak
Published on
Updated on

व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने आता मंगलकार्यांवरही संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फोंडा परिसरात काही विवाह सोहळे पुढे ढकलण्याची वेळ आली असून केटरर्स ऑर्डर घेण्यास नकार देत असल्याने वधू-वरांच्या कुटुंबीयांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळणे कठीण झाल्याने केटरिंग व्यवसायिक हतबल झाले आहेत. गॅसच उपलब्ध नसल्याने जेवणाची व्यवस्था कशी करायची, हा प्रश्न उभा राहिला आहे. परिणामी काही केटरर्सनी नवीन ऑर्डर घेणे थांबवले आहे. त्यामुळे काही कुटुंबांनी विवाह सोहळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. या कार्यक्रमांसाठी आरक्षित केलेली सभागृहेही रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

सध्या गॅस वितरणाच्या बाबतीत आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याने ग्राहकही वैतागले आहेत. घरगुती गॅस वितरणाला परवानगी असली तरी सिलिंडरसाठी प्रत्यक्ष वितरकाकडे जाऊन नोंदणी करावी लागत आहे. पूर्वीची ऑनलाइन नोंदणी बंद झाल्याने गॅस एजन्सीसमोर मोठ्या रांगा लागल्या आहेत. रोजची कामे सोडून गॅस नोंदणीसाठी ताटकळत उभे राहावे लागत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

LPG Gas Cylinder
Goa LPG Gas Shortage: मध्यपूर्वेतील युद्धाचा गोव्यातील हॉटेल व्यवसायाला चटका! राज्यात सिलिंडरचा तुटवडा

फोंड्यात ४००हून अधिक व्यावसायिक गॅसवर अवलंबून

फोंडा तालुक्यात भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या दोन कंपन्यांकडून गॅस वितरण केले जाते. व्यावसायिक गॅससाठी चारशेहून अधिक व्यावसायिकांची नोंदणी आहे. मात्र सध्या व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्याने केटरर्स, हॉटेल व्यवसायिक आणि रस्त्यावरचे खाद्यपदार्थ विक्रेते मोठ्या अडचणीत सापडले आहेत. काही ठिकाणी आम्लेट-पाव विकणाऱ्यांनाही गाडे बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

LPG Gas Cylinder
Goa Gas Cylinder Shortage: कुणी गॅस देता का गॅस? राज्यात सिलिंडरचा तुटवडा, कळंगुटसह अनेक भागांत ग्राहकांच्या रांगा; हॉटेल व्‍यवसाय संकटात

पाच किलो सिलिंडर ५६० रुपयांना

गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी काळाबाजार सुरू झाल्याचीही चर्चा आहे. विशेषतः पाच किलोचा सिलिंडर तब्बल ५६० रुपयांना विकला जात असल्याचे समजते. मात्र हे व्यवहार चोरीछुपे होत असल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com