Black Panther: ब्लॅक पँथरसोबत आढळले 2 बछडेही! करसंगे परिसरात नागरिकांना दर्शन; स्थानिकांमध्ये उत्सुकता आणि भीती

Black Panther Cubs Goa: दोन महिन्यांपासून वावरणाऱ्या ब्लॅक पँथरच्या जोडप्याने करसंगे येथील घनदाट जंगलात दोन बछड्यांना जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे.
Black panther in borim goa
Black panther in borim goaDainik Gomantak
Published on
Updated on

बोरी : बोरी गावाच्या अतिदुर्गम भागात गेल्या दोन महिन्यांपासून वावरणाऱ्या ब्लॅक पँथरच्या जोडप्याने करसंगे येथील घनदाट जंगलात दोन बछड्यांना जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिकांनी या ब्लॅक पँथरच्या जोडप्यासोबत दोन लहान बछडे जंगल परिसरात फिरताना पाहिल्याचे सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांत या जोडप्याचा वावर शिवरामगड मिरंगा तसेच खाजोर्डा परिसरातील जंगल भागातही आढळून आला होता. मात्र सध्या करसंगे येथील दाट जंगल परिसरात हे जोडपे आपल्या बछड्यांसह फिरताना दिसत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही नागरिकांना सकाळच्या व सायंकाळच्या वेळी जंगलाच्या कडेला या प्राण्यांची हालचाल दिसून आली. बछडे लहान असल्याने मादी पँथर अधिक सतर्क असल्याचेही सांगितले जात आहे.

Black panther in borim goa
Black Panther: ब्लॅक पॅंथरची दहशत वाढली! पाळीव प्राण्याचा पाडला फडशा; नागरिकांत भीतीचे वातावरण

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहलासोबत काहीशी भीतीचे वातावरणही निर्माण झाले आहे. विशेषतः शेतकरी व गुरे चारणारे नागरिक जंगलाच्या दिशेने जाण्याबाबत सावधगिरी बाळगत आहेत.

Black panther in borim goa
Black Panther: गोव्यात ‘ब्लॅक पँथर’चा दरारा! कुडणेत संचार; बोरी परिसरात दोघांच्या वावराने वाढली भिती Video

दरम्यान, नागरिकांनी या बाबत संबंधित वन विभागाला माहिती देण्याची मागणी केली आहे. वन विभागाने परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com