Mulgao: मुळगाव खाणप्रश्नी तिढा सुटणार! मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक, सकारात्मक तोडग्याचे आश्वासन

Mulgao Mining: २०२१ च्या प्रादेशिक आराखड्यानुसार बफर झोनचे सिमांकन करतानाच मुळगाववासियांचे प्रमुख प्रश्न सोडवा, असे निर्देश मुख्यमंत्री सावंत यांनी संयुक्त बैठकीत वेदांता (सेसा) कंपनीला दिले.
Mulgao Mining
Mulgao MiningDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: मुळगाव येथील खनिज खाणप्रश्नी निर्माण झालेला तिढा सुटण्याच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत. २०२१ च्या प्रादेशिक आराखड्यानुसार बफर झोनचे सिमांकन करतानाच मुळगाववासियांचे प्रमुख प्रश्न सोडवा, असे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संयुक्त बैठकीत वेदांता (सेसा) कंपनीला दिले.

शुक्रवारी सायंकाळी झालेल्या संयुक्त बैठकीत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि मुळगावमधील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुळगावच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्यासह मुळगावमधील प्रतिनिधींनी गावचे प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुळगावच्या लोकांनी उपस्थित केलेल्या मागण्यांचा कंपनीने गांभीर्याने विचार करून गावचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश दिले.

Mulgao Mining
Mulgao mining: "खाणीवर रात्रपाळी बंद करा, अन्यथा खाण सुरू करू देणार नाही!" मुळगावात ग्रामस्थांचा एल्गार

दीड-दोन वर्षांपासून संघर्ष :

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे पुढील आठवड्यात बफर झोन सिमांकनाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे माहिती मिळाली आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून मुळगाव येथील खनिज खाण प्रश्न तापला आहे. खनिज खाणावरून मुळगाववासिय संघर्ष करीत आहेत. प्रादेशिक आराखडा २०२१ नुसार बफर झोन निश्चित करून रात्रपाळी बंद करण्याच्या प्रमुख मागण्या मुळगाववासियांनी मांडल्या आहेत.

Mulgao Mining
Mulgao Mining: 'खनिज' प्रश्न पेटला! मुळगाववासियांची खाणीवर धडक; प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी

पर्वरीत बैठक

मुळगावमधील खनिज खाण प्रश्नी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी पर्वरी येथे सचिवालयात मुळगावमधील ग्रामसंस्थांच्या प्रतिनिधीसमोर संयुक्त बैठक झाली. या बैठकीस डिचोलीचे उपजिल्हाधिकारी शुभम नाईक आणि मामलेदार शैलेंद्र देसाई, मुळगावचे सरपंच सुहासिनी गोवेकर, उपसरपंच विशालसेन गाड, पंच गजानन मांद्रेकर, तृप्ती गाड, देवस्थानाचे अध्यक्ष कृष्णनाथ परब, वेदांताचे उपमुख्य अधिकारी धीरजकुमार जगदीश आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pramod Sawant Alvara Land Warning
Goa Politics
Pramod Sawant Meeting Central Officials
Goa CM Pramod Sawant accident help
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com