Mobile Tower: तळावलीत शाळेजवळ मोबाईल टॉवरचा घाट!

Talavali: कंत्राटदाराची दादागिरी : खोदला खड्डा; पालक, ग्रामस्थांकडून होतोय तीव्र विरोध
Goa Mobile Tower
Goa Mobile TowerDainik Gomantak
Published on
Updated on

Talavali: मडकई मतदारसंघातील वाडी-तळावली येथील भेडशे शाळेच्या अगदी जवळच मोबाईल टॉवर उभारण्यासाठी कार्यवाही सुरू केल्यामुळे स्थानिकांनी त्‍यास तीव्र विरोध केला आहे. शाळेजवळ मोबाईल टॉवर उभारल्याने मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची भीती पालकांनी व्‍यक्त केली आहे.

मोबाईल टॉवर अन्यत्र उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ असे स्थानिकांनी सांगूनही कंत्राटदाराचा हेकेखोरपणा सुरूच आहे. त्‍यामुळे लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तळावली येथील सदर शाळेच्या आवाराची संरक्षक भिंत मोडून बुधवारी मोबाईल टॉवर उभारणाऱ्या कंत्राटदाराने आत यंत्रसामग्री घातली. त्यामुळे नागरिकांना धक्काच बसला.

भर शाळेच्या आवारात मोबाईल टॉवर उभारण्यासाठी कुणी परवानगी दिली, असा सवाल करून मुलांच्या आरोग्याशी सरकार खेळत आहे काय, असा सवाल त्‍यांनी उपस्‍थित केला. मोबाईल टॉवरला आमचा विरोध नाही, पण तो भर लोकवस्तीत आणि तोही शाळेच्या अगदी जवळ उभारल्याने त्याचे वाईट परिणाम विद्यार्थ्यांवर होण्याची भीती आहे.

त्यातच वाडी-तळावली पंचायतीने मोबाईल टॉवर उभारण्यासाठी कोणताच परवाना दिलेला नाही. मग ही जबरदस्ती का, असा सवाल पंचायत मंडळाने केला आहे.

Goa Mobile Tower
Goa: बेघर महिला-पुरुषांना ‘स्ट्रीट पॉव्हिडन्स’ संस्था ठरतेय हक्काचा निवारा

मोबाईल टॉवरबाबत कुणालाच कल्‍पना न देता जबरदस्तीने शाळेच्या अगदी जवळ तो उभारण्‍याच्‍या प्रकारामुळे गावात संताप व्‍यक्त केला जात आहे. पालकांनी तर तीव्र विरोध केला असून स्थानिकांनीही अशा प्रकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्‍यामुळे आम्‍ही हा लढा प्राणपणाने लढू. - शाणूदास सावंत, श्री महालक्ष्मी विद्यालयाचे व्यवस्थापक, तळावली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com