Old Goa heritage Dainik Gomantak
गोवा

Old Goa Excavation: जुने गोव्यात उत्खननात सापडले पोर्तुगीजकालीन तोफगोळे; पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून कामाला स्थगिती

Portuguese-Era Cannonballs Discovered: भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) या घटनेची गंभीर दखल घेत, योग्य कागदपत्रे आणि नोंदी घेण्यासाठी विकास कामाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

Akshata Chhatre

Portuguese-Era Cannonballs Unearthed in Old Goa Excavation

जुने गोवा: जुने गोव्यात पर्यटन विभागाच्या विकास प्रकल्पादरम्यान पोर्तुगीजकालीन शस्त्रागारातील तोफगोळे सापडल्याने राज्यात खळबळ उडाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) या घटनेची गंभीर दखल घेत, योग्य कागदपत्रे आणि नोंदी घेण्यासाठी विकास कामाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. केंद्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या योजनेअंतर्गत काम सुरु असतानाच ही घटना घडली आहे.

केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ (तीर्थक्षेत्र कायाकल्प आणि अध्यात्मिक संवर्धन मोहीम) योजनेअंतर्गत पर्यटक सुविधा केंद्र आणि वाहनतळाच्या बांधकामासह विकास कामे सुरू होती. ‘एएसआय’चे सहाय्यक अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. किशोर रघुवंश यांनी दिलेल्या माहितीनुसार, साफसफाईच्या कामादरम्यान काही तोफगोळे सापडले. त्यामुळे छायाचित्रण, रेखाचित्रे आणि अहवालांद्वारे योग्य कागदपत्रे तयार करण्यासाठी ‘एएसआय’ने पर्यटन विभागाला काम थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. ही प्रक्रिया सध्या सुरू असून तिला काही वेळ लागू शकतो.

बेसिलिकापासून १०० मीटरच्या आत कोणत्याही बांधकामाला परवानगी देऊ नये

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. रविवारी (दि.२३ मार्च) शेकडो आंदोलकांनी जुने गोव्यात निदर्शने केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे तोडणे आणि उत्खनन कामाला त्यांनी विरोध केला.

युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेल्या बेसिलिका ऑफ बॉम जीझसजवळील प्रस्तावित मॉल प्रकल्पासाठी हा परिसर साफ केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. हे क्षेत्र वारसा स्थळ असून येथे जुन्या चर्चचे अवशेष असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या ठिकाणापासून १०० मीटरच्या आत कोणत्याही बांधकामाला परवानगी देऊ नये अशी मागणी आंदोलकांनी केलीय.

या परिसरात कोणताही मॉल बांधला जात नाहीये

पर्यटन विभागाने दिलेल्या स्पष्टीकरनुसार, या परिसरात कोणताही मॉल बांधला जात नाहीये. हा प्रकल्प या क्षेत्राचे वारसा महत्त्व जपत, पर्यटकांचा अनुभव वृद्धिंगत करण्यासाठी तयार करण्यात आलाय. सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या निर्देशानुसार, काम तात्पुरते थांबवण्यात आले आहे आणि ‘एएसआय’कडून मंजुरी मिळाल्यानंतर ते पुन्हा सुरू केले जाईल असे देखील विभागाने सांगितले.

पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, “हा प्रकल्प केवळ पर्यटकांच्या सुविधा वाढवण्यावर केंद्रित आहे. यामध्ये वाहनतळ, माहिती केंद्र आणि स्मारकासाठी सुधारित प्रकाशयोजना यांचा समावेश आहे. सर्व आवश्यक परवानग्या योग्य प्रकारे मिळवल्या गेल्या आहेत आणि आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम सुरू झाले होते.

सध्या, केवळ स्थळ साफसफाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. पंचायतीकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला असून कोणतेही बांधकाम सुरू करण्यापूर्वी सर्व आवश्यक परवानग्या मिळवल्या देखील मिळवल्या जातील."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT