Goa Tourism: राज्‍यात पर्यटनाला 'अच्छे दिन' नव्याने येणारा 'डिजिटल नोमॅड व्हिसा’ नेमका काय?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि गोवा पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर यांच्या उपस्थितीत गोवा पर्यटन मंडळाची चौथी बैठक
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism : राज्‍यात पर्यटनाला आणखी चालना देण्यासाठी आणि उच्च श्रेणीच्‍या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘डिजिटल नोमॅड व्हिसा’बाबत मुख्यमंत्री तसेच परराष्ट्रमंत्र्यांशी आपण चर्चा करणार आहे. होमस्टे, कारवाँ, हेरिटेज होम आणि अॅग्रो-इको टुरिझम पॉलिसी येत्‍या दीड महिन्यात कार्यान्वित होऊ शकते, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि गोवा पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर यांच्या उपस्थितीत गोवा पर्यटन मंडळाची चौथी बैठक झाली. त्‍यानंतर खंवटे पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्‍हणाले की, गोवा टुरिझम बोर्डाने ‘डिजिटल नोमॅड व्हिसा’बाबत चर्चा केली, जी टेक टुरिझम प्रमोशनचा एक भाग आहे. या व्‍हिसासाठी आम्हाला परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा करावी लागेल आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांची मदत घ्यावी लागेल.

‘डिजिटल नोमॅड व्हिसा’ ग्रामीण भागात होमस्टे पर्यटन, तंत्रज्ञान पर्यटन, रोजगार आणि एकूण अर्थव्यवस्थेला चालना देईल. बोर्डाच्या बैठकीत होमस्टे, कारवाँ, हेरिटेज होम आणि अॅग्रो-इको टुरिझम धोरणांवर चर्चा झाली असून या पॉलिसी येत्‍या दीड महिन्यात कार्यान्वित होऊ शकतील, असे खंवटे म्हणाले.

Goa Tourism
Goa News - मंत्री सुभाष फळादेसाईनी केली हळर्ण किल्ल्याची पहाणी | Gomantak TV

दरम्‍यान, आजच्‍या बैठकीत चार अधिकारप्राप्त समित्या, नवीन पर्यटन सेवा, जमीन आणि पायाभूत सुविधा, विपणन, जनसंपर्क आणि कायदेविषयक बैठकांना मान्यता देण्यात आली. गोवा पर्यटन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून अॅड. फ्रान्सिस ब्रागांझा यांचे नाव गोवा पर्यटन बोर्डाने पुढे केले आहे.

‘मोपा’वर विमानांची संख्या वाढविण्याची गरज

मोपा येथील मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळ कार्यान्‍वित झाल्‍यानंतर नवीन विमानांसाठी आम्ही एक मार्ग उघडला आहे. त्‍यासाठी दुबई, पोर्तुगाल आणि इतर अनेक देशांमध्ये प्रवास करून दर्जेदार पर्यटकांना गोव्‍याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने २६ टक्के विमान इंधन कमी करण्यास सांगितले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी विमान इंधनावर ८ टक्के कर लावला आहे. आता विमानांची संख्या वाढविण्याची गरज आहे. या विषयावर बोर्ड मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाशी चर्चा करणार आहे, असे पर्यटनमंत्री खंवटे यांनी सांगितले.

Goa Tourism
Goa Accident: चिंबल येथे थरार! पोलिसांचा पाठलाग अखेर बेतला जीवावर

राज्यात १०० कोटींचा युनिटी मॉल प्रकल्प केंद्र सरकार साकारेल, ज्यामध्ये प्रत्येक राज्यातील उत्पादने आणि गोव्यातील एका जिल्ह्यातील एक उत्पादन ठेवले जाईल. गोवा पर्यटन मंडळ केंद्राच्या निधीतून जागतिक दर्जाचे मत्स्यसंग्रहालय प्रस्तावित करणार आहे. त्‍यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्रही पाठविले आहे, अशी माहिती पर्यटनमंत्र्यांनी दिला. ‘गोवा आयर्नमॅन ७०.३’ हा पाच वर्षांसाठी वार्षिक कार्यक्रम असेल, असेही ते म्हणाले.

Goa Tourism
Petrol-Diesel Price Goa: गडकरी म्हणतात पेट्रोल 15 रूपये लिटर होईल, गोव्यातील इंधनाचे ताजे दर जाणून घ्या

नोमॅड व्हिसा’ म्‍हणजे काय?

जगातील अनेक देश आता ‘डिजिटल नोमॅड व्हिसा’ देऊ लागले आहेत. या व्‍हिसाद्वारे आपण एखाद्या देशात फिरायला जाऊन तेथूनच आपली नोकरी करू शकतो. त्‍यासाठी आपल्‍याकडे फक्त इच्‍छाशक्ती आणि वाय-फाय सुविधा असावी लागते. इंडोनेशिया, जर्मनी, आईसलँड, ग्रीस, मॉरिशस, पोर्तुगाल, नॉर्वे, बहामा, स्पेन, चेक रिपब्लिक हे देश ‘डिजिटल नोमॅड व्हिसा’ देऊ लागले आहेत. आता लवकरच भारताचाही त्‍यात समावेश होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com