Old Goa Panchayat Meeting
Old Goa Panchayat MeetingDainik Gomantak

Old Goa: पाणी समस्येवरून जुने गोवेतील नागरिक संतप्त! मेगा प्रकल्पांना परवानगी न देण्याचा इशारा; भूजल पातळी घटल्याचा दावा

Old Goa Gramsabha: जुने गोवे पंचायतीच्या अखत्यारीत मेगा प्रकल्पांना यापुढे परवानगी देऊ नये. कारण अगोदरच अनियोजित प्रकल्प आल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
Published on

Old Goa Mega Projects Water Crisis

तिसवाडी: जुने गोवे पंचायतीच्या अखत्यारीत मेगा प्रकल्पांना यापुढे परवानगी देऊ नये. कारण अगोदरच अनियोजित प्रकल्प आल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. एक महिन्यापासून नियमित पाणी पुरवठा होत नाही. या समस्येचे निवारण न केल्यास पंचायतीत येऊन धरणे देणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी ग्रामसभेत दिला.

आपत्कालीन परिस्थितीत पंचायत पाणी पुरवठा करणार. मेगा प्रकल्पांना परवानगी देण्यास पूर्वीच नकार दिलेला आहे, असे उत्तर यावेळी उपसरपंच विश्वास कुट्टीकर यांनी दिले.

नगर नियोजन खात्याने परवानगी दिल्यास जुने गोव्याची क्षमता आता पूर्ण झाल्याने परवानगी नाकारण्यात यावी. ही मागणी केवळ मोठ्या रहिवासी प्रकल्पांसाठी असून याचा त्रास सगळ्यांना होत आहे, तसेच एकदा आल्यानंतर या प्रकल्पांनी बोअरवेल घातल्याने भूजलाची पातळी खाली जात आहे. एका प्रकल्पाने सुमारे चार ते पाच बोअरवेल घातल्याची माहिती ग्रामस्थांनी यावेळी दिली. यासंदर्भात संबंधित खात्यामार्फत पाहणी करावी, असा ठराव एकमताने संमत झाला.

Old Goa Panchayat Meeting
Old Goa Helipad: गोव्यात हेलिपॅडवरुन केवळ 55 यशस्वी उड्डाणे! खर्च मात्र कोटीत; 'बॅट' बेटाचा पर्याय पुढे

अतिक्रमण केलेल्या गाड्यांवर कारवाई

जुने गोवा येथे फुटपाथवरती अतिक्रमण केलेल्या गाड्यांचा विषय सध्या उच्च न्यायालयात असून न्यायालयाच्या निर्देशानुसार आम्ही कारवाई करणार आहोत. पंचायतीने केवळ फिरत्या गाड्यांना परवानगी दिली होती, परंतु त्यांनी जर अतिक्रमण केले असेल, तर कारवाई करून गाडे जप्त केले जाईल, अशी माहिती सरपंच मेधा पर्वतकर यांनी दिली.

Old Goa Panchayat Meeting
Old Goa History: सफर गोव्याची! खिलजीच्या आक्रमणानंतर मांडवी किनाऱ्यावरच्या 'हेळे'ला राजधानीचा दर्जा लाभला

बफर झोनमध्ये बांधकामांना बंदी घाला

जुने गोवा हे जागतिक वारसा स्थळ असून येथे बफर झोनमध्ये एक मजल्याच्या बांधकाम करण्यास बंदी आहे, असे असूनही अनेक ठिकाणी या प्रकारची बांधकामे येऊ लागल्याचा मुद्दा ग्रामस्थ ग्लेन काब्राल यांनी मांडला. यावर त्वरित बंदी घातली नाही, तर अनेक वादग्रस्त बंगले जागतिक वारसा स्थळ असलेल्या जुने गोव्यात दिसणार आहेत, अशी भीती काब्राल यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com