Old Goa: मेरशी सर्कल ते जुने गोवे जंक्शन उजव्या बाजूची वाहतूक बंद; पर्यायी मार्ग कोणता वापराल? जाणून घ्या

Ribandar Bypass Service Road: राष्ट्रीय महामार्ग-७४८ वरील रायबंदर बायपास येथील सेवामार्गाचे बांधकाम सुरू असल्यामुळं जुने गोवे महामार्गावर वाहतूक वळविण्यात आलीय.
Ribandar Bypass Service Road
Ribandar Bypass Service RoadDainik Gomantak
Published on
Updated on

Ribandar Panaji To Old Goa Traffic Update

पणजी : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७४८ च्या (मेरशी सर्कल ते जुने गोवे जंक्शन) उजव्या बाजूकडील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

२४ जानेवारी ते २३ मार्च या कालावधीत हा मार्ग बंद राहणार असून, पणजीहून फोंडा येथे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग दिला आहे. राष्ट्रीय महामार्ग-७४८ वरील रायबंदर बायपास येथील सेवामार्गाचे बांधकाम सुरू आहे.

या प्रकल्पाच्या अंतर्गत मुख्य मार्गावरील बॉक्स कल्व्हर्टचं बांधकाम करण्यात येणार आहे. काम सुरळीत आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी मुख्य मार्गावरील उजवीकडील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

Ribandar Bypass Service Road
Goa Politics: गोवा काँग्रेस सरकारला घेरण्यात अपयशी; दोन वर्षांत एकही अहवाल नाही, नामी संधी घालवल्याने विरोधक नापास

कंत्राटदाराला कामाच्या जागेभोवतीचा परिसर योग्यरित्या बॅरिकेडिंग केलेला असावा जेणेकरून अनुचित अपघात होऊ नयेत याची खात्री करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देण्यात आले आहे. वाहनचालकांच्या माहितीसाठी रस्ता बंद, प्रवेशद्वार नाही, डायव्हर्जन घ्या इत्यादी योग्य चिन्हे देखील लावावीत.

वाहतूक सुरळीत राखण्यासाठी मोटारचालकांच्या वापरासाठी पर्यायी/तात्पुरता मार्ग उपलब्ध करून द्यावा. तसंच वाहतूक कोंडी आणि जनतेची गैरसोय टाळण्यासाठी ठेकेदाराला लवकरात लवकर अधिक कामगार नियुक्त करून काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Ribandar Bypass Service Road
Goa Politics: कळंगुटच्या विकासासाठी सिक्वेरा-लोबोंनी एकत्र यावे; श्रीपाद नाईकांचे आवाहन

सेवामार्गाचं बांधकाम सुरू असलेल्या परिसरात शाळा जवळ असल्यानं, स्थानिक रहिवासी, शाळेतील मुलांना त्यांच्या संबंधित शाळेत जाण्यासाठी सोय करून खबरदारीच्या सर्व उपाययोजनांसह पादचाऱ्यांना प्रवेश देण्यात यावा.

कंत्राटदाराला काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावर उरलेली रेती, माती आणि दगड ताबडतोब काढून टाकावेत. परिसर स्वच्छ करावा, जेणेकरून वाहनं घसरू नयेत, असेही निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com