Ponda Assembly Election 2027 Dainik Gomantak
गोवा

Ponda By Election: फोंड्यात निवडणुकीचे पडघम! दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; कोणाची लागणार लॉटरी?

Ponda Assembly Election 2027: फोंडा मतदारसंघ रवी नाईक यांच्या निधनानंतर गेले आठ महिने आमदाराविना आहे. त्यामुळे या मतदारसंघाचा विकास पूर्णत: ठप्प झाला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

फोंडा: फोंडा मतदारसंघ रवी नाईक यांच्या निधनानंतर गेले आठ महिने आमदाराविना आहे. त्यामुळे या मतदारसंघाचा विकास पूर्णत: ठप्प झाला आहे. फोंडा हे राज्यातील एक प्रमुख शहर. पण सध्या आमदाराविना या शहराची अवस्था ‘असुनी नाथ मी अनाथ’ अशी झाली आहे.

आता पुढील सात-आठ महिनेही असेच काढावे लागणार असल्यामुळे फोंडावासीयांची अवस्था ‘आगीतून फुफाट्यात’ अशी होण्याची शक्यता वाटत आहे. या पार्श्वभूमीवर फोंड्यात आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. वीजमंत्री तथा मडकई मतदारसंघाचे आमदार सुदिन ढवळीकर यांच्या फोंड्यातून रिंगणात उतरण्याच्या शक्यतेमुळे फोंड्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

ढवळीकर यांनीही आपले मोहरे हलविण्यास सुरुवात केल्याचे स्पष्टपणे दिसत असून फोंड्याच्या मगोप कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याची सूचना दिल्या आहेत. गेल्यावेळी या मतदारसंघातून भाजपचे रवी नाईक विजयी झाल्यामुळे तसेच या मतदारसंघात भाजपची ताकद मोठी असल्यामुळे भाजप हा मतदारसंघ मगोपला देईल, असे वाटत नाही. हे पाहता मगोप-भाजप युतीवरच संशयाचे ढग जमा व्हायला लागले आहेत.

दुसऱ्या बाजूला रद्द झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेले रितेश रवी नाईक यांनीही मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसते. दिवंगत रवी नाईक यांनी या मतदारसंघात केलेले कार्यही रितेश यांच्या मदतीला येऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. पोटनिवडणूक रद्द झाल्यामुळे हुकलेली संधी यावेळी मिळविणारच, असा निर्धार रितेश यांचे कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत.

मात्र, सुदिन यांनी मगोपची वेगळी चूल थाटल्यास गेल्या निवडणुकीप्रमाणे याहीवेळी भाजप-मगोप व काँग्रेस यामध्ये तिरंगी लढत होऊ शकते. गेल्यावेळी भाजपचे रवी नाईक हे अवघ्या ७७ मतांनी काठावर विजयी झाले होते. यावेळी तिरंगी लढत झाल्यास भाजप हे आव्हान पेलू शकेल का, याचा फायदा काँग्रेसला होईल का मगोप बाजी मारेल, हे बघावे लागेल.

सध्या काँग्रेसचे कुशावती जिल्हाप्रमुख राजेश वेरेकर यांनीही समाजोपयोगी उपक्रमांचा धडाका लावला असून ते मतदारांच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत. गेल्या निवडणुकीत थोड्या मतांनी पराभव पत्करावा लागल्यामुळे यावेळी ते ताकसुद्धा फुंकून पिताना दिसत आहे. दिवंगत डॉ. केतन भाटीकर यांचे बंधू डॉ. कौतुक हेही आपल्या परीने समाजसेवा करत असून दिवंगत बंधूंचे कार्य पुढे नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

नशिबात असेल तर आमदार होईन, असे ते म्हणत असले तरी ते खरेच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजपचे आणखी एक इच्छुक उमेदवार नगरसेवक विश्वनाथ दळवी यांचीही भूमिका स्पष्ट झालेली नाही. एकंदरीत पाहता सध्या फोंड्यात राजकीय वातावरण तप्त होत चालले असून येत्या काही दिवसांत अनेक नवीन समीकरणांचा उदय होण्याचे संकेत मिळत आहेत.

युतीची भिस्त फोंड्यावर?

मगोप-भाजप युतीची भिस्त आता प्रामुख्याने फोंड्यावर असल्याचे दिसून येते. मगोपचे सर्वेसर्वा सुदिन हे फोंड्यात ‘एन्ट्री’ करण्याच्या तयारीत असल्याच्या वार्तेमुळे सध्या भाजपच्या गोटात खळबळ उडाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याला कसे तोंड द्यायचे, याची रणनीती भाजपतर्फे आखण्यात येत असल्याचेही कळते. आता नक्की काय होते, हे कळायला चतुर्थीची वाट पहावी लागणार, हे निश्चित

काँग्रेसची भूमिका स्पष्ट

सध्या राजेश वेरेकर हे काँग्रेसची ‘कमान’ यशस्वीपणे सांभाळताना दिसत असून विद्यमान प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यातील संघर्षाचा तसेच त्यातून निर्माण झालेल्या गटबाजीचा फोंड्यात तरी काहीही परिणाम दिसत नाही. त्यामुळे सध्या फोंड्याच्या काँग्रेसने कार्यावर ‘फोकस’ केल्याचे दिसत आहे.

ढवळीकर फोंड्यात ‘करिश्मा’ दाखवणार?

सुदिन ढवळीकर हे मडकई मतदारसंघातून सहावेळा निवडून आले असून त्यांचे मताधिक्य प्रत्येक निवडणुकीबरोबर वाढताना दिसत आहे. गेल्या निवडणुकीत तर ते भाजपवर तब्बल दहा हजारांची आघाडी घेऊन विजयी झाले होते. आता फोंड्यात आल्यास ते काय ‘करिश्मा’ दाखवू शकतात, यावर सध्या फोंडा शहरात चर्चा रंगू लागली आहे.

ढवळीकर यांच्या फोंड्यातून रिंगणात उतरण्याच्या शक्यतेमुळे फोंड्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ganesh Immersion: गणेश विसर्जनासाठी गोव्यात 47 ठिकाणी जीवरक्षक तैनात! 35 समुद्रकिनारे आणि 12 अंतर्गत विसर्जनस्थळी विशेष सुरक्षा व्यवस्था

Indian Ship Attack: अरबी समुद्रात भारतीय जहाजावर भीषण हल्ला! 13 भारतीयांची सुटका, 1 बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालय आक्रमक

Two Wheeler Ban Porvorim: पर्वरी उड्डाणपुलावर दुचाकींना 'नो एंट्री'! अपघातानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये; 65 किमी वेगमर्यादा, रडार आणि सीसीटीव्हीचीही तयारी

Goa Crime: 5 लाखांची सुपारी, कॅसिनो संचालकावर गोळीबार! मुख्य शूटर उत्तर प्रदेशातून जेरबंद; नेपाळला पळून जाण्याच्या होता तयारीत

Harmanpreet Kaur Record: हरमनप्रीत कौरने रचला इतिहास! मिताली राजचा रेकॉर्ड मोडीत काढत बनली आशियातील यशस्वी कॅप्टन; भारताने 8व्यांदा जिंकली 'आशिया कप ट्रॉफी'

SCROLL FOR NEXT