Accident News: दोन महिन्यांपूर्वी घेतली कार, 100च्या स्पीडमध्ये 20 फूट हवेत उडून झाडावर आदळली… भीषण अपघातात 7 तरुणांचा मृत्यू

Buxar Road Accident NH 319a 7 Youths Died: बिहारमधून एक भीषण अपघाताची धक्कादायक घटना समोर आली. NH-319A महामार्गावर गुरुवारी रात्री घडलेल्या अपघातात सात तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Buxar Road Accident NH 319a 7 Youths Died
Buxar Road Accident NH 319a 7 Youths DiedDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Buxar Road Accident NH 319a 7 Youths Died: बिहारमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली. NH-319A महामार्गावर गुरुवारी रात्री घडलेल्या अपघातात सात तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे गाझीपूर आणि बक्सर परिसरात शोककळा पसरली. मित्राच्या लग्नाच्या वरातीत निघालेल्या चौघांचा आणि दुचाकीवरील तिघांचा यात बळी गेला. गाझीपूर जिल्ह्यातील भतौरा येथील तरुण कैमूरमधील विशुनपुरा येथे वरातीसाठी जात असताना बक्सरच्या राजपूर हद्दीतील सोनपा गावाजवळ हा अपघात घडला.

गावातील तीन तरुण दुचाकीवरुन घराबाहेर पडून केवळ पन्नास मीटर पुढे गेल्यावर समोरुन भरधाव येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कारचा वेग ताशी शंभर किलोमीटरपेक्षा अधिक होता आणि चालकाचा ताबा सुटल्याने ही थरारक दुर्घटना घडली.

Buxar Road Accident NH 319a 7 Youths Died
Accident News: मंगलकार्य आटोपून घरी निघाले अन् वाटेत काळाने गाठले! कार- ट्रेलरची जोरदार धडक; 6 जणांचा मृत्यू VIDEO

या धडकेनंतर कार सुमारे वीस फूट हवेत उडाली, पाच-सहा वेळा पलटी खात दहा फूट खोल पाण्याच्या खड्ड्यावरुन थेट झाडावर जाऊन आदळली. मोठा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थ व प्रत्यक्षदर्शी रविरंजन सिंह, राजेश राय यांनी धाव घेत चक्काचूर झालेल्या कारचे दरवाजे तोडून आतील तरुणांना बाहेर काढले. या भीषण दुर्घटनेत कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर चौघांचा रुग्णालयात (Hospital) उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Buxar Road Accident NH 319a 7 Youths Died
Accident News: चालकाचे नियंत्रण सुटले अन् क्षणात खेळ खल्लास! देव दर्शनाहून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात चिमुकल्यासह 6 जणांचा मृत्यू

मृत्यू झालेल्यांमध्ये उतरौली येथील बावीस वर्षीय अरुण कुमारचा समावेश असून, तो सैन्यात भरती होण्याची तयारी करत होता आणि अपघाताच्या एक दिवस आधीच मामाच्या गावी सोनपा येथे आला होता. त्याच्यासोबत दुचाकीवरील शुभम कुमार (21) आणि शिवम कुमार (18) यांचाही मृत्यू झाला. तर भतौरा गावातील बादल कुमार (30), इरफान अन्सारी (25), अरबाज अली (20) आणि दिव्यांशु ठाकूर (22) या कारमधील तरुणांना प्राण गमवावे लागले. दोन महिन्यांपूर्वीच सेकंड हँड कार घेतलेला चालक छांगुर कुमार ऊर्फ सत्येंद्र (25) हा घटनेनंतर बेपत्ता असून, पोलिस आणि नातेवाईक त्याचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.