Goa Politics: भाजप, मगो आणि काँग्रेसच्या चक्रव्युहात अडकलेला प्रियोळ मतदारसंघ!

priol Constituency: कला अकादमीतील नित्कृष्ट दर्जाच्या कामामुळे कला व संस्कृती खात्याचे माजी मंत्री व प्रियोळ मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे हे नेहमीच कलाकारांच्या निशाण्यावर राहिले आहेत.
priol Constituency
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. नाऊ वरक

कला अकादमीतील नित्कृष्ट दर्जाच्या कामामुळे कला व संस्कृती खात्याचे माजी मंत्री व प्रियोळ मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे हे नेहमीच कलाकारांच्या निशाण्यावर राहिले आहेत. प्रियोळ हा मतदारसंघ प्रियोळातील घडामोडींपेक्षा माजी सभापती रमेश तवडकर व गावडे यांमधील वाद व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरचे आमदाराचे वाद यासाठीच जास्त गाजला. यातूनच शेवटी १८ जून, २०२५ ला गोवा क्रांतिदिनी मुख्यमंत्र्यांनी गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला.

अनुसूचित जमातीतील आमदारांमधील वैयक्तिक संघर्षामुळे प्रियोळ मतदारसंघ मंत्रिपदास मुकला. १९८७ मध्ये गोवा घटकराज्य झाल्यानंतर १५ नवीन विधानसभा मतदारसंघांची निर्मिती झाली. प्रियोळ हा त्यातलाच एक मतदारसंघ. सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या या मतदारसंघाचे गेल्या ३६ वर्षांत सरकारमधील वजन अपेक्षेप्रमाणे वाढले नाही. त्यामुळे या मतदारसंघाच्या राजकीय वाटचालीची चिकित्सा करणे आवश्यक आहे.

priol Constituency
Goa Politics: 'युती'च्या तोंडावर 'यादी'चा बॉम्ब! "चर्चा सुरू असताना यादी जाहीर करणं धक्कादायक", काँग्रेसच्या भूमिकेवर मनोज परब नाराज

महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षाचे प्राबल्य असलेल्या फोंडा व मडकई मतदारसंघांचे काही भाग एकत्र करून प्रियोळ मतदारसंघाची निर्मिती झाली. १९८४ मध्ये कुंभारजुवेमधून निवडून आलेल्या मगोच्या डॉ. काशिनाथ जल्मी यांनी १९८९ मध्ये प्रियोळ मधून निवडणूक लढवली व ११,७६६ एवढ्या मताधिक्याने निवडून आले. चर्चिल आलेमाव व रमाकांत खलप यांच्या १९९० मधील पुरोगामी लोकशाही आघाडीच्या सुमारे नऊ महिन्याच्या सरकारात जल्मी कायदेमंत्री झाले.

घटकराज्यानंतर ‘बहुजन समाज’ या एकसंध अस्मितेचे विघटन होऊ लागले. फोंडा, मडकई, प्रियोळ व कुंभारजुवे या मतदारसंघांत ‘गौड मराठा समाज’ ही राजकीय अस्मिता ठळकपणे पुढे आली. जल्मी या अस्मितेचा चेहरा होते. १९९४ मध्ये भाजप आणि मगो यांची युती असली तरी जल्मी यांची मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्याशी जवळीक होती. म्हणूनच राणे यांचे प्रतिस्पर्धी विल्फ्रेड डिसोझा यांचा विरोध असतानाही जल्मी यांना सभापती तोमाझीन कार्दोज यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून मान्यता दिली.

priol Constituency
Goa ST Representation Bill: लोकसभेत पुन्हा गोंधळ! गोवा एसटी विधेयक मंजूर झालचं नाही; CM सावंतांनी काँग्रेसवर साधला निशाणा

याच काळात केरी, फोंडा येथील थापर-डूपॉन्ट कंपनीच्या नायलॉन ६,६ प्रकल्पाला विरोध होऊ लागला. मोहन वेरेकर, दत्ताराम देसाई, क्लॉड अल्वारीस यासारखे राजकीय नेते व पर्यावरणवादी या प्रकल्पाला प्रखर विरोध करू लागले. नीलेश नाईक या युवकाचा या आंदोलनात मृत्यू झाला. जल्मी यांनी या प्रकल्पाविषयी मौन बाळगले. येथूनच त्यांचा प्रियोळमधील राजकीय प्रभाव कमी झाला.

शशिकला काकोडकर यांचा भाजपकडे कल होता तर जल्मी मगोचे स्वतंत्र अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करत होते. १९९४ मध्ये मोहन वेरेकर यांनी अपक्ष म्हणून जल्मी ह्यांच्या विरोधात निवडणूक लढवली व त्यांचे मताधिक्य कमी केले. १९९६ मध्ये जल्मी यांनी मुरगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, त्यात चर्चिल आलेमाव यांनी त्यांचा पराभव केला. १९९९ च्या निवडणुकीत भाजपच्या विश्वास सतरकर यांनी जल्मी यांचा प्रियोळमधून पराभव केला आणि येथेच मगोत वैचारिक स्थित्यंतर घडून आले

priol Constituency
Karnataka Political Crisis: सिद्धरामय्या देणार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा? दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग; डी. के. शिवकुमार यांच्या नावाचा सस्पेन्स वाढला

. सतरकर यांनी विल्फ्रेड डिसोझा यांच्या विरोधात सभापती प्रतापसिंग राणे यांच्याकडे अपात्रता याचिका दाखल करून मनोहर पर्रीकर-फ्रान्सिस्को सार्दिन्ह सरकार वाचविले. सतरकर २००२ मध्ये पुन्हा प्रियोळमधून निवडून आले व भाजपने त्यांना सभापतिपद दिले. २००७ व २०१२ च्या निवडणुकांत मतदारांनी मगोच्या दीपक ढवळीकरांना निवडून दिले.

२०१२ मध्ये अपक्ष गावडे यांचा दीपक ढवळीकर यांनी २१०० मतांनी पराभव केला. तर २०१७ मध्ये अपक्ष गावडे यांनी ढवळीकरांना ४६८६ मतांनी मात दिली.

priol Constituency
Goa Politics: लोबोंना उमेदवारी देऊन चूक! विश्वासघात करणाऱ्यांना आता नाही प्रवेश- गिरीश चोडणकर

२०१७ मध्ये उमेदवारांची संख्या कमी होती. २०२२ मध्ये ८ उमेदवार रिंगणात होते. २०१७ व २०२२ मध्ये ढवळीकर यांना अनुक्रमे १०,४६३ व १०,८०६ मते मिळाली आहेत. २०२२ मध्ये अपक्ष संदीप निगळये आणि रिव्हॉल्यूशनरी गोवन्सचे विश्वेश नाईक यांना अनुक्रमे २६९७ आणि २५१७ मते मिळाली. डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या ज़िल्हा पंचायत निवडणुकीत वेलिंग-प्रियोळची जागा मगोने जिंकली तर बेतकी-खांडोळा येथून अपक्ष सुनील जल्मी जिंकले.

प्रियोळमध्ये अनुसूचित जमाती आणि ओबीसींची लोकसंख्या तुलनेने समान आहे. प्रियोळमधील मतदार सामाजिक गतिशीलतेपेक्षा सांस्कृतिकवादाकडे झुकणारा आहे. २०१९ मध्ये मंत्री गावडे यांनी ‘घुमट’ गोव्याचे लोकवाद्य घोषित केले. अशा परिस्थितीत प्रियोळ जर अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले तर घुमटाचा नाद गोविंद गावडे यांच्या बाजूने घुमू शकतो.

गावडे यांनी २००७ ची निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावरून लढवून आपली राजकीय कारकीर्द मडकई मतदारसंघातून सुरू केली.

priol Constituency
Goa Politics: 'गोवा फॉरवर्ड-भाजप युतीच्या बातम्या फक्त अफवा', मतदारांची दिशाभूल करणाऱ्यांना आमदार सरदेसाईंनी सुनावले

तेव्हापासून ढवळीकर बंधूंचे विरोधक म्हणून त्यांची राजकारणात ओळख आहे. २०१७ च्या निवडणुकीत त्यांचा आम आदमी पक्षाकडे कल होता. त्यांचे गुरु व दिवंगत काँग्रेस नेते रवि नाईक यांनी डिसेंबर२०२१ मध्ये भाजप प्रवेश केल्यानंतर गावडेही भाजपजवळ गेले. ज्यावेळी गावडेंवर आरोप-प्रत्यारोप झाले व मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले, तेव्हा काँग्रेस पक्षाने गावडेंची पाठराखण केली. तसेच फोंड्यातील काँग्रेस नेते राजेश वेरेकर यांच्याशीही त्यांचे घनिष्ट संबंध आहेत. भाजपचा मित्रपक्ष मगोकडे प्रियोळमध्ये उमेदवार आहे, मात्र काँग्रेसकडे आजही तेथे सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे गावडे येणाऱ्या निवडणुकीत नवीन राजकीय मार्ग चोखाळतील का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com