Night Curfew

 

Dainik Gomantak 

गोवा

'...तर गोव्यात नाईट कर्फ्यू लागू करा'

तज्ज्ञ समितीची शिफारस, शाळा बंद करण्याचाही सल्ला

दैनिक गोमन्तक

पणजी : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या शेजारील राज्यांनी नाईट कर्फ्यू (Night Curfew) लागू केला आहे. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून गोव्यातही नाईट कर्फ्यू लागू करावा, अशी शिफारस तज्ज्ञ समितीने केली आहे. हॉटेलमध्ये राहणाऱ्या पर्यटकांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. सक्रिय बाधितांची संख्या 1 हजाराहून अधिक झाल्यास शाळा बंद करण्याची शिफारस समितीने केली आहे.

अन्य राज्यांत ओमिक्रॉनचे (Omicron Variant) रुग्ण वाढत असतानाच सोमवारी गोव्यातही ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. याबरोबरच कोरोना बाधितांची संख्याही वाढत असल्यामुळे सोमवारी तज्ज्ञ समितीची बैठक झाली. या समितीमध्ये आरोग्य संचालक, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ. शेखर साळकर तसेच अन्य तज्ज्ञ डॉक्टर सदस्य आहेत.

सोमवारी झालेल्या या तज्ज्ञ समितीच्या बैठकीनंतर बुधवारी कृती समितीचीही बैठक होणार आहे. मागील दोन महिन्यांत कोरोनाबाधित मिळण्याचे वाढलेले प्रमाण आणि संख्या यांचा आढावा या बैठकीत घेतला जाईल.

राज्यात (Goa) सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1 हजारांच्यावर गेल्यास राज्याच्या सीमांवर चाचणी करावी, तसेच बाधितांचे प्रमाण 3.5 टक्क्यांवर पोहोचल्यास शाळांतील वर्ग बंद करावे, असंही तज्ज्ञ समितीने सुचवलं आहे. यासोबतच सीमांवरच प्रवाशांची चाचणी करावी आणि हॉटेल, रेस्टॉरंटवर 50 टक्के क्षमतेने चालवण्याचे निर्बंध घालावेत, अशी शिफारस समितीने केली आहे.

राज्यात सक्रिय बाधितांची संख्या 3 हजारांहून अधिक झाल्यास पर्यटन कार्यक्रम, चित्रपटगृह, जलतरण तलाव, मॉल बंद करावेत, अशी शिफारस करण्यात आली आहे. सक्रिय बाधितांची संख्या 10 हजारांहून अधिक झाल्यास राज्यात अधिकाधिक निर्बंध (Restriction) घालण्यासह लॉकडाऊनही (Lockdown) करण्यास हरकत नसल्याचं तज्ज्ञ समितीने सुचवलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT