गोव्यात ‘समृद्धीचे सरकार’ आणण्यासाठी मला पाठिंबा द्या: कामत

मी विविध प्रकल्प पूर्ण केले आहेत आणि अनेक प्रकल्प होण्याच्या मार्गांवर आहेत, असे विरोधी पक्षनेते व आमदार दिगंबर कामत म्हणाले.
Digambar Kamat Margao

Digambar Kamat Margao

Dainik Gomantak

Published on
Updated on

मडगाव: मडगाव शहराच्या विकासासाठी मी नेहमीच अथक परिश्रम घेतले आहेत. मडगावला अत्याधुनिक शहरात रूपांतरित करण्यासाठी मला तुमच्या पाठिंब्याची आणि आशीर्वादाची गरज आहे, असे विरोधी पक्षनेते व आमदार दिगंबर कामत म्हणाले. मी विविध प्रकल्प पूर्ण केले आहेत आणि अनेक प्रकल्प होण्याच्या मार्गांवर आहेत. गोव्यातील जनतेला ‘समृद्धीचे सरकार’ परत आणण्यासाठी आणि ‘गरिबीचे सरकार’ आणणाऱ्या भाजप सरकारची राजवट संपवण्यासाठी राज्यभरातील काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन त्‍यांनी केले.

Digambar Kamat Margao

खाण कंपन्यांच्या दबावाखाली राज्य सरकार झुकले, लीजधारकांना होणार अटक?

मडगाववासीयांनी राज्याच्या सर्वांगीण विकास आणि प्रगतीसाठी नेहमीच योगदान दिले आहे. यावेळी २०२२मध्ये काँग्रेसचे (Congress) स्थिर सरकार स्थापन करण्यात मडगाववासीय आपली निर्णायक भूमिका बजावतील. मी माझ्या मतदारांना (Voters) आवाहन करतो की, मला सलग आठव्यांदा मडगावचे प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, असे आवाहन आमदार दिगंबर कामत यांनी केले.

Digambar Kamat Margao

साखळी पालिकेची मुख्‍यमंत्र्यांकडून सतावणूक: धर्मेश सगलानी

प्रचाराला प्रारंभ

पिंपळकट्टा येथे मडगाव (Margao) मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार म्हणून आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी देव दामोदर चरणी नारळ अर्पण केल्यानंतर आपल्या शेकडो समर्थकांना संबोधित करताना कामत बोलत होते. यावेळी त्‍यांच्‍यासमवेत स्वातंत्र्यसैनिक वामन प्रभुगावकर, मडगावच्या उपनगराध्यक्ष दीपाली सावळ, दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ज्यो डायस, नगरसेवक दामोदर शिरोडकर, लता पेडणेकर, सँड्रा फर्नांडिस, सगुण नाईक, सिद्धान्‍त गडेकर आणि दामोदर वरक, माजी नगरसेवक अविनाश शिरोडकर, मनोज मसुरकर, गुरुनाथ लाड, ज्येष्ठ पत्रकार अनिल पै, डॉ.जयेश कुडचडकर आदींसह समर्थक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com