मडगाव पालिकेच्या प्रकल्पांवर आचारसंहितेची टांगती तलवार

पालिकेचे अनेक प्रकल्प आवश्यक परवानग्या न मिळाल्याने रखडलेलेच
Margao Municipal Council

Margao Municipal Council

Dainik Gomantak

Published on
Updated on

मडगाव : मडगाव नगरपालिकेचे नियोजित अनेक प्रकल्प संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक ती मंजुरी न मिळाल्यामुळे रखडल्याचं चित्र आहे. आता तर ते निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात सापडतात की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Margao Municipal Council

खाण कंपन्यांच्या दबावाखाली राज्य सरकार झुकले, लीजधारकांना होणार अटक?

या प्रकल्पांमध्‍ये मडगाव पालिकेसाठी (Margao) प्रतिष्ठेचा गणला गेलेला बहुमजली पार्किंग प्रकल्प तर आहेच शिवाय शहराला भेडसावणाऱ्या कचरा समस्येवर तोडगा काढणारा सोनसोडो प्लांट, 25 टीपीडी बायोमिथेनेशनचे दोन प्लांट यांचाही समावेश आहे. सोनसोडो (Sonsodo) प्रकल्पात साचलेला व वरचेवर पेट घेणारा कचरा बाहेर हटविण्यासाठी कंत्राटदार नियुक्त करण्याचा प्रश्नही आवश्यक त्या मंजुरीअभावी रखडून आहे. आता या प्रकल्पांच्या मार्गातील अडथळे दूर करून पालिका ते पूर्ण करते की आचारसंहिता संपेपर्यंत प्रतीक्षा करायला लावते, याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

Margao Municipal Council

साखळी पालिकेची मुख्‍यमंत्र्यांकडून सतावणूक: धर्मेश सगलानी

यातील बहुतांश प्रकल्प (Project) हे पालिका मंडळाने पाच महिन्यांपूर्वी म्हणजे 9 जुलै रोजी झालेल्या आपल्या पहिल्या बैठकीतच मंजूर केले होते. ते सगळेच मंजुरी मिळविण्यासाठींच्या विविध टप्प्यांवर आहेत. आचारसंहिता लागू झाली तर पालिकेला त्यांच्या निविदा काढता येणार नाहीत आणि तसे झाले तर तीन ते चार महिने कचरा समस्या जटील बनण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 25 टीपीडी प्लांटसाठीही चांगला प्रतिसाद मिळून किमान पाच कंपन्यांकडून इच्छा प्रस्ताव आले होते, ते नंतर सरकारनियुक्त तांत्रिक समितीकडे पाठविले. पण तेथून मंजुरी मिळालेली नाही. आता ती दिली तरी पालिकेला पुढील सोपस्कार करण्यासाठी पुरेसा वेळ उरलेला नाही.

Margao Municipal Council

डिचोलीत 'सिटी लायव्हलीहूड सेंटर', महिला गटांना मिळणार व्यासपीठ

सोनसोडो प्लांट चालविण्यासाठी कंत्राटदार नियुक्त करण्याच्या निर्णयाचेही काहीसे असेच झाले आहे. प्रथम एकच प्रस्ताव आला. त्यामुळे पुन्हा बोली मागविल्या असून लवकरच त्या उघडल्या जातील. पण तोपर्यंत आचारसंहिता लागू झाली तर ते कामही लांबणीवर पडण्‍याची चिन्हे दिसत आहेत. बहुमजली पार्किंग प्रकल्पासाठी निविदा मागविल्या गेल्या होत्‍या. प्रथम एकही निविदा आली नाही, म्हणून पुन्हा मुदत वाढविली गेली. आता त्या 30 रोजी उघडल्या जातील. त्यावेळी निविदा आल्या तरी सर्व सोपस्कार पूर्ण करेपर्यंत आचारसंहितेची टांगती तलवार आहेच.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com