Goa FDA Raid: पर्यटकांना बनवलं बनावट ग्राहक! कळंगुट-म्हापशात निकृष्ट दर्जाचे काजू, चॉकलेट जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Goa FDA Raid Mapusa Calangute: गोव्याची ओळख असलेल्या काजू आणि चॉकलेटच्या नावाखाली पर्यटकांची होणारी फसवणूक आता अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) रडारवर आली आहे.
Goa FDA Raid Mapusa Calangute
Goa FDA RaidDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याची ओळख असलेल्या काजू आणि चॉकलेटच्या नावाखाली पर्यटकांची होणारी फसवणूक आता अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) रडारवर आली आहे. म्हापसा आणि कळंगुटमध्ये राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काजू आणि चॉकलेट जप्त करण्यात आले असून अनेक विक्रेत्यांना मोठा दंड ठोठावण्यात आला.

गोव्यातील (Goa) म्हापसा यार्ड आणि किनारपट्टी भागात विकल्या जाणाऱ्या काजू आणि केळीच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाला काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पर्यटकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या विक्रेत्यांची खातरजमा करण्यासाठी 'एफडीए'ने विशेष पथकाद्वारे ही कारवाई केली. म्हापसा परिसरात केलेल्या तपासणीत एकूण 12 विक्रेत्यांची कसून चौकशी करण्यात आली, ज्यापैकी 6 विक्रेते नियमांचे उल्लंघन करताना आढळले. या विक्रेत्यांना 5 हजार रुपयांपासून ते थेट 25 हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात आला.

Goa FDA Raid Mapusa Calangute
FDA Goa Raid: एफडीएची मोठी कारवाई! पर्वरीत 700 किलो 'बनावट' पनीर जप्त; अवैध रिपॅकेजिंगचा पर्दाफाश VIDEO

या मोहिमेदरम्यान प्रशासनाने सुमारे 50 किलो निकृष्ट दर्जाचे 'पेपर काजू' जप्त केले. विशेष म्हणजे या काजूवर (Cashews) कोणत्याही प्रकारचे लेबल नव्हते, ज्यामुळे त्यांची शुद्धता आणि एक्सपायरी डेट कळणे अशक्य होते. त्याचप्रमाणे 10 किलो 'स्टीन चॉकलेट' देखील विना लेबल आढळल्याने ते जप्त करण्यात आले. एका अन्य खाद्यपदार्थ विक्रेत्यालाही स्वच्छतेचे आणि गुणवत्तेचे नियम धाब्यावर बसवल्याबद्दल 5 हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

Goa FDA Raid Mapusa Calangute
North Goa FDA Raid: उत्तर गोव्यात एफडीएची कारवाई; नोंदणी नसलेल्या आस्थापनांना दंड

कळंगुटमध्ये ही कारवाई अधिक नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली. येथील 12 काजू दुकानांची तपासणी करण्यासाठी प्रशासनाने वाहतूक पोलिस निरीक्षकांच्या मदतीने एक वेगळीच युक्ती लढवली. पथकाने काही पर्यटकांना 'बनावट ग्राहक' म्हणून दुकानात पाठवले आणि त्यांच्यामार्फत प्रत्यक्ष विक्री होणाऱ्या मालाचा दर्जा तपासला. सुदैवाने, या गुप्त तपासणीत असे दिसून आले की, पर्यटकांना सर्रास विकले जाणारे काजू सर्वसाधारणपणे चांगल्या दर्जाचे होते आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे तेलकट काजू विक्रीसाठी ठेवलेले नव्हते.

Goa FDA Raid Mapusa Calangute
FDA Raid Goa: 'चॉकलेट ॲनालॉग'चा काळाबाजार उघड! FDA ने सापळा रचून पकडले; डिचोली-कळंगुटमध्ये तपासणी

गोव्यात येणारा प्रत्येक पर्यटक आठवण म्हणून काजू खरेदी करतो. अशा वेळी विना लेबल आणि निकृष्ट मालाची विक्री झाल्यास राज्याच्या पर्यटनाच्या प्रतिमेवर परिणाम होतो. त्यामुळेच 'एफडीए'ने ही मोहीम कडक केली आहे. विना लेबल माल विकणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाईचा इशारा देण्यात आला असून, पर्यटकांनी देखील वस्तू खरेदी करताना पाकिटावरील लेबल आणि गुणवत्तेची खात्री करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या कारवाईमुळे निकृष्ट माल विकणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com