Bogda Dainik Gomantak
गोवा

Bogda: भूस्खलनामुळे नागरीक भयभीत; आमदार अमोणकरांनी काढला मार्ग

बोगदा येथील घरांना असणारा भूस्खलनाचा धोका संपणार

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: बोगदा येथे भूस्खलनाचा धोका असणारी अनेक घरे आहेत. या घरांना प्रशासन सतर्कतेच्या नोटिस पाठवत असते. यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे, कारण मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी जीसुडाच्या माध्यमातून या प्रश्नावर मार्ग काढला असल्याची माहिती समोर आली आहे.

(MLA Sankalp Amonkar has come up with a solution to the landslide problem at Bogda)

बोगदा येथे भूस्खलनामुळे भीतीने जगत असलेल्या नागरिकांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. कारण मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या हस्ते बुधवारी सडा येथील प्रभाग क्रमांक 5 व 6 मध्ये रिटेनिंग वॉल व खडी टाकण्याच्या कामांचा शुभारंभ केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना आमोणकर म्हणाले की, हा प्रकल्प 3 कोटी रुपयांचा होता आणि तो जीसुडा मार्फत घेण्यात आला होता.

"आम्ही पाहिले आहे की दरवर्षी या भागातील अनेक घरे खाली करण्याच्या नोटिस येतात आणि भूस्खलनाचा धोका आहे आणि लोक नेहमीच भीतीच्या वातावरणात राहतात. मात्र, आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मी विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला आणि पहिल्यांदाच या घरांना नोटीस मिळालेल्या नाहीत, तरीही, आम्ही मजबूत राहून कामे करू,असे नियोजन केले होते. भूस्खलनावर उपाय म्हणून या भागात मजबूत राखीव भिंत बांधण्याचे काम हाती घेतले असल्याचे आमोणकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT