CM Pramod Sawant : पर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; बेरोजगारांनाही मिळणार संधी

भरतीला नेमका किती कालावधी लागणार?
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

पर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी गोवा सरकारने कंबर कसली आहे. अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली असून, 'टुरिस्ट गार्ड'ची भरती गोवा राज्यात केली जाणार आहे. त्यामुळे गोव्यातील बरोजगारांना आता नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(CM Pramod Sawant informed that Tourist Guard post will be recruited in Goa)

CM Pramod Sawant
Goa Winter Session: जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास सरकार घाबरते का? आमदार फेरेरांनी सोडले टिकास्त्र

मिळालेल्या माहितीनुसार गोव्यात होमगार्डच्या धर्तीवर पोलीस खात्यात 'टुरिस्ट गार्ड' पद निर्मिती केली जाणार आहे. यासाठी गोवा सरकार अशा प्रकारची भरती करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे. यामुळे अनेक गोमंतकीय बेरोजगार युवकांना नोकरीसाठी नवे मार्ग खुले होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी ही भरती कधी होणार? असे मुख्यमंत्र्यांना विचारले असता लवकरच असे उत्तर त्यांनी दिले आहे. त्यामुळे याला नेमका किती कालावधी लागणार आहे ? हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

CM Pramod Sawant
Goa Mining : राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी खनिज व्यवसाय महत्त्वाचा; भाजपचा दावा

गोव्यातील पर्यटनाचा दर्जा उंचावणार?

गोवा समुद्रकिनारी परीसरातील नागरीकांनी पर्यटकांना नियमावली समजणे आवश्यक तसेच पर्यटन स्थळावरील ठिकाणांना वाढत्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी वेगळी नियुक्ती केली जावी अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज घोषणा केल्याने गोव्यातील पर्यटनाचा दर्जा उंचावण्यासह गोमंतकीय बेरोजगार युवकांनाच्या हाताला काम मिळण्यासाठी नवा एक मार्ग निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com