Goa Mining : राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी खनिज व्यवसाय महत्त्वाचा; भाजपचा दावा

राज्य सरकारने यापूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे राज्यात खनिज व्यवसाय सुरू होत असून तीन ब्लॉक्सचे ई लिलाव प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.
Goa mining
Goa miningDainik Gomantak

राज्य सरकारने यापूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे राज्यात खनिज व्यवसाय सुरू होत असून तीन ब्लॉक्सचे ई लिलाव प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. यामुळे खनिज पट्ट्यात आनंदाचे वातावरण असून हा व्यवसाय राज्याच्या अर्थव्यवस्थेला पाठबळ देणारा तर ठरेलच, शिवाय स्थानिकांची क्रयशक्ती वाढवेल, असे मत भाजपचे प्रवक्ते यतीश नायक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी आमदार प्रेमेंद्र शेट आणि दाजी साळकर उपस्थित होते.

नायक पुढे म्हणाले, की राज्यातील खनिज व्यवसाय तातडीने सुरू व्हावा यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारचे प्रयत्न सुरू होते. यासाठी आता केंद्र सरकारने मदत केल्याने हा व्यवसाय तातडीने सुरू होत आहे. प्रामुख्याने केंद्र सरकारच्या अख्त्यारीत येत असलेले खनिजाच्या निर्यातीवरील 50 टक्के निर्यात शुल्क मागे घेऊन केंद्र सरकारने हा व्यवसाय सुरू करण्याला प्रोत्साहनच दिले आहे. याचा फायदा हा व्यवसाय सुरू करण्याला होईल. याशिवाय तज्ज्ञ कमिटीच्या सल्ल्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील अनेक वर्षे पडून असलेले डंप हाताळण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यात पडून असलेले लाखो मेट्रिक टन खनिज आता हाताळता येणार आहे. याचा परिणाम राज्य सरकारच्या महसूल वाढीवर होणार आहे.

Goa mining
IIT: सांगे नाहीतर मग कोठे होणार IIT? काय म्हणाले मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन!

खनिज खात्याने पुकारलेल्या राज्यातील चार खनिज ब्लॉक्सच्या ई-लिलावांपैकी तीन ई-लिलाव यशस्वीपणे पार पडले आहेत. त्यामुळे हा व्यवसाय सुरू होण्यामधील अडथळे आता संपल्याने राज्यातील खनिज खाणी लवकरच सुरू होतील. यासाठी पक्षातर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांंचे अभिनंदन केले आहे, असे भाजपचे प्रवक्ते यतीश नायक यावेळी म्हणाले.

पर्यावरण परवाने घ्यावेच लागणार

खाणी सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाचे परवाने नव्याने घ्यावे लागणार आहेत. यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते यतीश नायक यांनी दिली. या खाणी सुरू होण्यासाठी काही अवधी जाईल मात्र खाणी सुरू होतील, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com