Loksabha Election 2024  Dainik Gomantak
गोवा

South Goa : दक्षिणेत भाजपला ‘प्रयोग’ परवडेल का? मतदारांकडे लक्ष

South Goa : मागच्‍या तीन लोकसभा निवडणुकांचा निकाल वेगळाच

गोमन्तक डिजिटल टीम

सुशांत कुंकळयेकर

मडगाव, दक्षिण गोव्‍यात भाजपची ताकद वाढल्‍यामुळे असेल कदाचित भाजपने यावेळी दक्षिण गोवा ही आपली ‘प्रयोगशाळा’ करण्‍याचा निर्णय घेतला आहे, असे एकंदर स्‍थितीचा आढावा घेतल्‍यानंतर वाटते.

यातूनच दक्षिण गोव्‍यात भाजपने महिला उमेदवार उभा करण्‍याचे संकेत दिलेले आहेत. मात्र, दक्षिण गोवा मतदारसंघ अशा प्रयोगांना साथ देणार का? हा प्रश्‍न सध्‍या चर्चेत आला आहे. मागच्‍या तीन लोकसभा निवडणुकांच्‍या निकालांचा परामर्ष घेतल्‍यास दक्षिण गोव्‍याने प्रत्‍येकवेळी नव्‍या प्रयाेगाला नाकारले आहे, हेच दिसून आलेले आहे.

२००७ सालच्‍या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपने दक्षिण गोव्‍यातून डॉ. विल्‍फ्रेड मिश्‍किता यांना उमेदवारी देऊन ख्रिस्‍ती चेहरा मतदारांसमोर आणण्‍याचा प्रयोग केला होता. मात्र, या प्रयोगाला दक्षिण गोव्‍यातील मतदारांनी बाहेरची वाट दाखविताना मिश्‍किता यांचा सपशेल पराभव केला. ही पोटनिवडणूक फ्रान्‍सिस सार्दिन यांनी जिंकली होती.

मात्र, २००९ साली भाजपने नरेंद्र सावईकर या आपल्‍या कॅडरमधून वर आलेल्‍या उमेदवाराला दक्षिण गोव्‍यातून उभे केले आणि त्‍यावेळी प्रथमच दक्षिण गोव्‍यात भाजपला १,१४,८१८ मते प्राप्‍त झाली. काँग्रेसचे सरकार गोव्‍यात सत्तेत असतानाही फ्रान्‍सिस सार्दिन या निवडणुकीत फक्‍त १२,५८४ मतांच्‍या आघाडीने जिंकून आले होते.

२०१४ मध्‍ये काँग्रेसने प्रयोग करण्‍याचा प्रयत्‍न केला. फ्रान्‍सिस सार्दिन यांना उमेदवारी नाकारून काँग्रेसने आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स यांना उमेदवारी दिली आणि त्‍याचा परिणाम म्‍हणजे भाजपचे नरेंद्र सावईकर रेजिनाल्‍डच्‍या विराेधात ३१,९५० मतांच्‍या प्रचंड आघाडीने जिंकून आले.

२०१९ साली झालेल्‍या निवडणुकीत सार्दिन व सावईकर हे दोघेही एकमेकांच्‍या विरोधात उभे होते. मात्र, मगोची साथ नसल्‍याने सावईकर यांचा १०,०७४ मतांनी पराभव झाला.

या तिन्‍ही निवडणुकीतील मतांच्‍या आकडेवारीवर लक्ष घातल्‍यास काँग्रेस असो किंवा भाजप दोन्‍ही पक्षांतील मतदारांनी जर चांगला उमेदवार असला तरच त्‍याला मतदान केले आहे,

हे उघड झाले आहे आणि तुम्‍ही कितीही प्रयोग केले तरी तुम्‍हाला आम्‍ही साथ देणार नाही, हे सिद्ध करून दाखविले आहे. अशा परिस्‍थितीत भाजपने यावेळी दक्षिण गोव्‍यातून महिला उमेदवार किंवा ख्रिस्‍ती उमेदवार उभा केल्‍यास मतदार त्‍याला साथ देतील का? हा प्रश्‍न उभा राहिला आहे.

सावईकर हेच सक्षम उमेदवार!

जिंकून येण्‍याची क्षमता, या मुद्यावर भाजपने दक्षिण गोव्‍यातून वेगवेगळी नावे समोर आणली असली तरी मागच्‍या तीन निवडणुकांचा आलेख घेतल्‍यास नरेंद्र सावईकर हेच अधिक सक्षम उमेदवार असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

२०१९ च्‍या निवडणुकीत मगो पक्षाची साथ नसतानाही सावईकर यांनी दक्षिण गोव्‍यातून १,९१,२०५ मते मिळवली. जी २०१४ च्‍या तुलनेत फक्‍त ६,९७१ मतांनी कमी हाेती. यावेळी मगो पक्षाची ताकद भाजपबरोबर आहे.

त्‍याशिवाय मडगावात दिगंबर कामत आणि नावेलीत उल्‍हास तुयेकर हे भाजपचे आमदार आहेत. त्‍यामुळे दक्षिण गोव्‍यात नरेंद्र सावईकर यांना उमेदवारी दिल्‍यास ते सहज जिंकून येऊ शकतात, अशी प्रतिक्रिया सावईकर यांचे एकेकाळचे सहकारी असलेले ॲड. प्रणव सावर्डेकर यांनी व्‍यक्‍त केली.

मतदारांना गृहित धरणे चुकीचे ठरू शकते!

दक्षिण गोव्‍यातील मतदार हा सूज्ञ मतदार आहे. त्‍याला गृहित धरणे चुकीचे आहे, तसेच ते धोक्याचेही ठरू शकते, असे मत राजकीय विश्‍लेषक ॲड. क्‍लिओफात आल्‍मेदा कुतिन्‍हो यांनी व्‍यक्‍त केले.

लोकसभा निवडणुकीत मतदार मतदान करतात त्‍यावेळी फक्‍त पक्षाकडे पाहून मतदान करत नाहीत तर उमेदवार कोण यालाही महत्त्व असते. ज्‍या-ज्‍यावेळी कुठल्‍याही पक्षाने लाेकसभेत जाण्‍यासारखा साजेसा उमेदवार उभा केला नाही, त्या-त्‍यावेळी मतदारांनी त्‍याला पाडले आहे. अपवाद फक्‍त चर्चिल आलेमाव हे आहेत. मात्र, चर्चिल आलेमाव यांना व्‍यापक अशी लोकप्रियता होती, हेही नाकारून चालणार नाही, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Healthcare Expenditure: गोव्याचा आरोग्य क्षेत्रासाठी 1527 कोटींचा बूस्टर डोस! राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत तिप्पट खर्च; देशात ठरले 'रोल मॉडेल'

Goa State Women Commission: राज्य महिला आयोगाचा कारभार 87 दिवसांपासून ठप्प! माजी अध्यक्षा रंजिता पै यांच्यानंतर नव्या नियुक्तीला सावंत सरकारला मुहूर्त मिळेना

Colvale Jail Attack: लाथाबुक्क्यांनी तुडवले, तुरुंग कर्मचारी धावले अन् देवराजला वाचवले! कोलवाळ कारागृहात पुन्हा कैद्यावर हल्ला; अंतर्गत सुरक्षेचे धिंडवडे

Goa Casino: गोव्यातील कॅसिनोचे कंबरडे मोडणार! आता 40 टक्क्यांपर्यंत भरावा लागणार 'जीएसटी', व्यवसाय कोलमडण्याची भीती

Horoscope 28 May 2026: गुरुवारचा दिवस खास! 'या' राशींवर होणार लक्ष्मीची कृपा; बिझनेसमध्ये नवीन संधीचा योग

SCROLL FOR NEXT