Goa Politics: बोरकरांची खोलकरांना नोटीस; 3 दिवसांत माफी मागा, अन्यथा 6 कोटींचा मानहानी खटला!

Revolutionary Goans Party: प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाद्वारे तुम्ही आपल्याबाबत बदनामीकारक विधाने केली असून, एका राजकीय पक्षाकडून तीन कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला आहे.
Revolutionary Goans Party
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाच्या (आरजी) प्रदेशाध्यक्ष शविना शिरोडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केलेल्या अजय खोलकर यांचे पाय आणखी खोलात गेले असून, ‘आरजी’चे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेश बोरकर यांनी खोलकर यांना नोटीस जारी करून बिनशर्त लेखी माफी मागण्याची मागणी केली. अन्यथा, मानहानीप्रकरणी सहा कोटी रुपयांचा खटला दाखल करण्याचा इशाराही दिला आहे.

‘‘प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाद्वारे तुम्ही आपल्याबाबत बदनामीकारक विधाने केली असून, एका राजकीय पक्षाकडून तीन कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. हे आरोप खोटे, निराधार, बेजबाबदार आणि बदनामीकारक आहेत. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशानेच तुम्ही माझ्यावर हे आरोप केले आहेत.

Revolutionary Goans Party
Goa Government Jobs: आठवी, दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी संधी! 12 हजार तरुणांना रोजगाराचे लक्ष्य; सरकार उभारणार 25 कौशल्य केंद्रे

त्यामुळे नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांत तुम्ही माझी बिनशर्त लेखी माफी मागावी, भविष्यात कोणतीही बदनामीकारक विधाने किंवा आरोप करणे थांबवावे; अन्यथा तुमच्याविरोधात मानहानीप्रकरणी सहा कोटी रुपयांचा फौजदारी खटला दाखल करण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. तीन दिवसांच्या मुदतीत या मागण्या पूर्ण न केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल,’’ असे आमदार बोरकर यांनी नोटिशीत म्हटले आहे.

महिलांवरील अन्यायाविरोधात लढा : शविना

अजय खोलकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी शविना शिरोडकर आणि आरजीच्या युवा कार्यकर्त्यांनी बुधवारी चिंबल येथे आंदोलन छेडले. ‘‘सार्वजनिक जीवनात महिलांचे होणारे चारित्र्यहनन आणि त्यांच्याबद्दल केली जाणारी अपमानास्पद टिप्पणी यांविरुद्ध सर्वांनी एकत्रितपणे आवाज उठवावा. महिलांचा सन्मान हा केवळ पक्षांतर्गत विषय नसून तो संपूर्ण समाजाशी संबंधित मुद्दा आहे,’’ असे म्हणत शिरोडकर यांनी भाजप महिला मोर्चाच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Revolutionary Goans Party
Goa Dairy Workers: थकीत 'डीए'सह मागण्या मान्य करा, गोवा डेअरी कर्मचाऱ्यांचे 'घोषणाबाजी आंदोलन'

गैरव्यवहारावरून खोलकरांचे वीरेशना आव्हान

खजिनदारपदी असताना अजय खोलकर यांनी पक्षाच्या बँक खात्यातून २४ लाखांचा गैरव्यवहार केल्याचा आरोपही वीरेश बोरकर यांनी नोटिशीत केला आहे. त्यावर बोरकर यांनी हा आरोप सिद्ध करून दाखवावा, अन्यथा तुमचे राजकीय करिअर संपवून टाकेन, असा इशारा खोलकर यांनी दिला. त्यावर, ‘आपले राजकीय भविष्य खोलकर नव्हे, तर जनता ठरवेल. आरजीने कधीही केवळ राजकीय स्टंट केलेले नाहीत, तर लोकांच्या प्रश्नांबाबत आपण नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत, असे आमदार बोरकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.