Viral Video: तुम्हाला दिवाळीत काय मिळालं? सोनपापडी की ड्रायफ्रूट्स? 'या' कंपनीच्या बॉसनं कर्मचाऱ्यांना थेट iPhone 16 गिफ्ट केला! नेटकरी म्हणाले, 'व्हॅकन्सी आहे का?'

iPhone 16 Diwali bonus viral video: दिवाळी म्हटली की रोषणाई, फराळ, मिठाई आणि भेटवस्तूंची आठवण होते. नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तर दिवाळी बोनस आणि कंपनीकडून मिळणाऱ्या गिफ्टची विशेष उत्सुकता असते.
iPhone 16 Diwali bonus viral video
iPhone 16 Diwali bonus viral videoDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

दिवाळी म्हटली की रोषणाई, फराळ, मिठाई आणि भेटवस्तूंची आठवण होते. नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तर दिवाळी बोनस आणि कंपनीकडून मिळणाऱ्या गिफ्टची विशेष उत्सुकता असते. अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना मिठाईचे बॉक्स, ड्रायफ्रूट्स किंवा काही आकर्षक भेटवस्तू देऊन दिवाळी साजरी करतात.

मात्र, दिल्लीतील एका कंपनीने यंदा आपल्या कर्मचाऱ्यांना अशी भेट दिली की सोशल मीडियावर तिचीच चर्चा रंगली आहे. या कंपनीने कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या निमित्ताने चक्क iPhone 16 भेट दिले आहेत. या अनोख्या गिफ्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो पाहून अनेकांनी कंपनीच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी थेट या कंपनीत नोकरीची संधी आहे का, असा मजेशीर प्रश्न विचारला आहे.

कर्मचाऱ्यांच्या टेबलवर दिसले iPhone 16

दिल्लीतील रोहिणी परिसरात असलेल्या 'फायनान्सरसाब' (Financersaab) या कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी सेलिब्रेशनचे आयोजन केले होते. कंपनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून या कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 15 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये ऑफिसमधील कर्मचाऱ्यांच्या टेबलवर संगणकासमोर आकर्षक पद्धतीने सजवलेले iPhone 16 दिसत आहेत.

प्रत्येक कर्मचाऱ्याच्या टेबलवर ठेवलेल्या आयफोनला रंगीबेरंगी रिबन लावण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण ऑफिसमध्ये दिवाळीच्या भेटवस्तूंचा उत्साह पाहायला मिळाला. व्हिडीओच्या शेवटी महिला कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंदही लक्ष वेधून घेत आहे. कंपनीने हा व्हिडीओ शेअर करताना 'कोणतीही स्पर्धा नाही, तुम्हाला काय मिळाले?' अशा आशयाचे मजेशीर कॅप्शन दिले आहे.

iPhone 16 Diwali bonus viral video
Goa Politics: बोरकरांची खोलकरांना नोटीस; 3 दिवसांत माफी मागा, अन्यथा 6 कोटींचा मानहानी खटला!

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांचा प्रश्न, नोकरीची संधी आहे का?

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांना कर्मचाऱ्यांना मिळालेल्या या महागड्या भेटवस्तू पाहून आश्चर्य वाटले. काही युजर्सनी तर हा व्हिडीओ खरा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने तयार करण्यात आला आहे, असा प्रश्न उपस्थित केला.

यावर कंपनीनेही मजेशीर अंदाजात उत्तर दिले. हा व्हिडीओ पुन्हा एकदा पाहा, कारण हे सर्व खरे आहे, असे कंपनीने स्पष्ट केले. त्यानंतर एका युजरने थेट 'तुमच्या कंपनीत व्हॅकन्सी आहे का?' असा प्रश्न विचारला. या कमेंटचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

iPhone 16 Diwali bonus viral video
Goa Government Jobs: आठवी, दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी संधी! 12 हजार तरुणांना रोजगाराचे लक्ष्य; सरकार उभारणार 25 कौशल्य केंद्रे

कोणाला iPhone 16 तर कोणाला सोनपापडीचा डबाही नाही!

या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले की, अशा प्रकारचे व्हिडीओ पाहून जळफळाट होऊ नये यासाठी दिवाळीत इन्स्टाग्राम वापरणेच बंद करावे लागेल. तर दुसऱ्या युजरने आपली व्यथा मांडताना सांगितले की, त्यांना आपल्या बॉसकडून दिवाळीत सोनपापडीचा डबाही मिळाला नाही.

सामान्यतः दिवाळीत कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भेटवस्तूंची तुलना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये केली जाते. मात्र, एका कंपनीने थेट आयफोन भेट दिल्याने ही चर्चा अधिक रंगली आहे. कर्मचाऱ्यांच्या आनंदाला प्राधान्य देणाऱ्या या अनोख्या दिवाळी सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.