Goa Kadamba: महिनाधर धरणे धरलेल्या कदंब कर्मचाऱ्यांना अखेर दिलासा; 'नवीन बस खरेदीसह 7व्या वेतन'बाबत मुख्यमंत्री सकारात्मक

Goa Kadamba : कदंब युनियनचे महिनाभर सुरू असलेले आंदोलन शनिवारी स्थगित करण्यात आले
Kadamba
KadambaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Kadamba: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कदंब कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर केटीसी युनियनने आझाद मैदानावर महिनाभर सुरू असलेले आंदोलन शनिवारी सकाळी स्थगित केले.

शुक्रवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी युनियनला सोमवारी, 11 मार्चला कदंबा नवीन बसेसची खरेदी आणि 7व्या वेतनाच्या अंमलबजावणीसह इतर किरकोळ मागण्या पूर्ण करण्यासाठी करारावर स्वाक्षरी करण्याचे आश्वासन दिले आहे.

गेल्या महिनाभर भर उन्हात आजाद मैदानात बसून धरणे आंदोलन करणाऱ्या कदंब युनियनच्या सदस्यांनी शनिवारी सकाळी त्यांच्या आंदोलनाला स्थगिती दिल्याचे जाहीर केले.

यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कदंब युनियनचे म्होरके ऍड. सुहास नाईक यांनी नमूद केले की कदंब महामंडळाचे कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या होत्या त्यातल्या त्यात नवीन कदंब बस खरेदी करणे, आरिअर्स देणे, सातव्या वेतन आयोगाचा पगार, कामावर नियमित करणे आणि इतर काही मागण्या होत्या.

या सर्व मागण्यामधल्या काही महत्वाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या आणि इतर मागण्याची दखल घेण्याचे आश्वासन दिल्याने आम्ही हे धरणे आंदोलन स्थगित करण्याची घोषणा करतो.

पुढे, नाईक यांनी खुलासा केला की शुक्रवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी युनियनला सोमवारी त्यांच्या नवीन बसेसची खरेदी आणि 7व्या वेतनाच्या अंमलबजावणीसह इतर किरकोळ मागण्या पूर्ण करण्यासाठी करारावर स्वाक्षरी करण्याचे आश्वासन दिले आहे.

आमच्या इतर मागण्या जर अश्वासनाप्रमाणे पूर्ण होत नसतील तर मग आम्ही आजाद मैदानावर पुन्हा धरणे आंदोलन करू, असे त्यानी पत्रकार परिषदेत सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa Surla Farmers Compensation
Goa Olympians Development
Pramod Sawant Cabinet Meeting
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com