Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam नंतर गोव्यात जमीन घोटाळ्यांचा धुमाकूळ, रूपांतरणांविरुद्ध मजबूत ठराव करा; चोडणकरांचे पंचायतींना आवाहन

Goa Congress On Land Scam: सेटलमेन्ट झोन वाढीच्या बाबतीत अंतिम निर्णय घेण्याचा हक्क ग्रामसभेचा आहे असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.

Pramod Yadav

Goa Congress On Land Scam

पणजी: राज्यातील जमीन रूपांतरण घोटाळ्यांच्या वाढत्या संकटाविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याचे आवाहन काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी केले आहे.

काँग्रेस कार्यकारिणीचे स्थायी आमंत्रित सदस्य आणि गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी जमीन रूपांतरण घोटाळे वाढत असल्याची चिंता व्यक्त केली आहे.

"कॅश फॉर जॉबच्या घोटाळ्याने राज्याला हादरवून टाकले आहे आणि आता आणखी एक गंभीर समस्या भेडसावत आहे. अनियंत्रित जमीन रूपांतरण घोटाळा आमच्या शेती जमिनी, जंगल आणि पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रांवर गंभीर धोका निर्माण करीत आहे आणि गोव्याची ओळख लुप्त करत आहे."

"मागील आठवड्यात, दोन जमीनी बेकायदेशीरपणे सेटलमेन्ट झोनमध्ये रूपांतरित करण्यात आल्या. त्या ’नो डॅव्हलपमेन्ट स्लोप’ व ’नॅचरल कवर’ म्हणून वर्गीकृत करण्यात आल्या होत्या. तरीही या जमिनींचे रुपांतरण करण्यात आले आहे. यावरून पर्यावरण संरक्षण धोरणांना कसे नष्ट केले जात आहे हे स्पष्ट झाले आहे."

गिरीश चोडणकर यांनी प्रत्येक गोमंतकियांना त्यांच्या पुढच्या ग्रामसभेत भाग घेण्याचे आणि या मनमानी जमीन रूपांतरणांविरुद्ध मजबूत ठराव मंजूर करून करण्याचे आवाहन केले आहे. सेटलमेन्ट झोन वाढीच्या बाबतीत अंतिम निर्णय घेण्याचा हक्क ग्रामसभेचा आहे असे त्यांनी म्हटले आहे.

"जर आपल्या ग्रामसभेने या रूपांतरणांवर आधीच ठराव संमत केला असेल, तर आता पुन्हा कारवाईची वेळ आली आहे. जोपर्यंत या नगर नियोजन कायद्याच्या कलमांना रद्द केले जात नाही, तो पर्यंत सरकारवर दबाव ठेवणे आवश्यक आहे," चोडणकर यांनी म्हटलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT