Margao Railway Station Dainik Gomantak
गोवा

Margao Railway Station: मडगाव रेल्वे स्थानकाला मिळणार नवा लूक; निविदा जारी

पुनर्विकास करण्याचा कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचा निर्णय

Akshay Nirmale

Margao Railway Station: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने मडगाव रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी कोकण रेल्वेने आर्किटेक्चरल आणि तांत्रिक सल्ला मसलत प्रदान करण्यासाठी ई-निविदांद्वारे रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (RFP) मागवले आहे. (Kokan Railway Corporation Limited)

मडगाव रेल्वे स्थानकाच्या एकात्मिक पुनर्विकासात व्यवहार्यता, मास्टर प्लॅनिंग, नगर रचना, अभियांत्रिकी आणि तपशीलवार प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याशी संबंधित सल्लागार सेवांची मागणी याद्वारे केली आहे. 12 जून रोजी निविदा उघडल्या जातील.

मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना मडगाव स्थानकाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची विनंती केली होती.

कोकण रेल्वेचे चेअरमन कम मॅनेजिंग डायरेक्टर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मडगाव स्थानक पुनर्विकासासाठी प्राधान्याने घेण्याच्या सूचना आधीच मिळाल्या आहेत, असे कामत यांनी सांगितले होते. गोव्याच्या राज्यपालांनीही यासाठी आग्रह धरला होता.

मडगाव रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरालाही यामुळे नवसंजीवनी मिळू शकते. रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे सुशोभीकरण, यात रावणफोंड पूल ते खारेबंद पूल आणि रावणफोंड पूल ते व्हिक्टर हॉस्पिटल हे रस्ते तसेच ट्रॅफिक आयलंडचे पुनर्रचना करण्यात येणार आहे.

2017 मध्ये कोकण रेल्वेने पुनर्विकासासाठी हाती घेतलेल्या 10 रेल्वे स्थानकांमध्ये मडगाव, पेडणे आणि थिवी यांचा समावेश होता.

पुनर्विकास प्रकल्पामध्ये प्लॅटफॉर्म/मॉड्युलर निवारा, बायो-टॉयलेट, सीसीटीव्ही, मोफत वाय-फाय, टॉयलेट्स, अतिरिक्त काँक्रीट बेंच, नवीन वेटिंग हॉल, बुकिंग ऑफिस, एस्केलेटर, अतिरिक्त लूप लाईन्स, एथनिक फूड स्टॉल, एलईडी दिवे, स्टेशन-प्लॅटफॉर्मचा विस्तार, वाढीव पार्किंग क्षमता, एटीएम, डिजिटल प्रवासी माहितीफलक इत्यादींचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: दक्षिण गोव्यात भाडेकरू आणि पर्यटकांची पोलीस पडताळणी अनिवार्य

"ही राजकीय नाही, गोवा वाचवण्‍याची चळवळ"! निवृत्त न्‍या. फर्दिन रिबेलोंची हाक; वाचा घोषणापत्र आणि महत्वाचे मुद्दे..

Goa Road Projects: गोव्‍यासाठी 7076 कोटींच्‍या रस्त्यांचा प्रस्‍ताव गडकरींना सादर! मंत्री दिगंबर कामत यांची माहिती

Goa AAP:‘आप’ला गोव्यात लागलेल्या गळतीचे कारण दिल्लीतील नेतृत्व! कार्यकर्त्यांमध्ये बळावली भावना; पक्षाची वाढ खुंटण्याची शक्यता व्यक्त

Chimbel: 'प्रकल्प उभारा, पण संवेदनशील चिंबलमध्ये नको'! मुख्यमंत्र्यांशी चर्चेस तयार, शिरोडकरांचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT