Kadamba Transport: गोव्यातील कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (KTC) ला 15 मे पर्यंत 20 इलेक्ट्रिक वाहनांची (EVs) पुढील खेप मिळणार आहे. या बसेस दिव्यांगांसाठी सोयीस्कर अशा आहेत. त्यामुळे दिव्यांग प्रवाशांचा प्रवास सुखद होणार आहे.
नऊ मीटरच्या या इलेक्ट्रिक बसेस दिव्यांगांसाठी अनुकूल असणार आहेत. या 20 इलेक्ट्रिक बसेसमध्ये एक वैशिष्ट्य आहे. यात जिथे बसेसच्या पायऱ्या सोयीनुसार खाली किंवा वर करता येईल. त्यामुळे दिव्यांग प्रवाशांना बसमध्ये चढता येण्यास किंवा उतरताना सुलभता येईल.
हे विशेषत: व्हीलचेअरवरील व्यक्तींसाठी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि गर्भवतींसाठी लाभदायी ठरणार आहे. केवळ दिव्यांगांसाठीच नाही तर कोणत्याही त्रासाशिवाय बसमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी सुलभता प्रदान करेल.
KTC कडे सध्या राज्यात 50 इलेक्ट्रिक बसेस कार्यरत आहेत. या सर्व बसेस FAME (फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स) इंडिया योजनेच्या फेज II अंतर्गत आल्या आहेत. याच योजनेंतर्गत 148 मिनी-ईव्हीची ऑर्डर दिली आहे. त्यापैकी एक वाहन पणजी ते सोकोरो मार्गावर आधीच धावत आहे.
या नव्या दिव्यांगांसाठी अनुकूल असणाऱ्या 20 बसेस देखील याचाच भाग आहे. गोव्यात लवकरच 71 इलेक्ट्रिक बसेस कार्यरत होतील.
केटीसीच्या ताफ्यात 490 इंधनावर चालणाऱ्या बस आहेत, त्यापैकी 38 स्क्रॅपिंग धोरणांतर्गत भंगारात काढल्या जातील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महामंडळाने विद्यमान बसेसपैकी 25 टक्के बसेसमध्ये बदल करून त्या अपंगांना अनुकूल बनविल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.