Dabolim Airport: गोव्यातील दाबोळी विमानतळ झाले अत्याअधुनिक, अशी सुविधा वापरणारे आशिया खंडातील ठरले पहिलेच विमानतळ

अशी प्रणाली व सुविधा वापरणारे दाबोळी विमानतळ (Dabolim Airport) आशिया पॅसिफिक प्रदेशातील पहिले आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले आहे.
Dabolim Airport
Dabolim AirportDainik Gomantak
Published on
Updated on

Dabolim Airport: गोव्यातील दाबोळी विमानतळावर भारतीय बनावटीच्या आधुनिक सुविधेचा वापर करण्यास प्रारंभ झाला आहे. विमानतळावर गगन म्हणजेच जीपीएस प्रणित दिशादर्शक प्रणालीचा आधार घेत, एलपीव्ही (लोकलायझर परफॉर्मन्स विथ वर्टिकल गाईडन्स) या सुविधा वापर सुरू केला आहे.

अशी प्रणाली व सुविधा वापरणारे दाबोळी विमानतळ (Dabolim Airport) आशिया पॅसिफिक प्रदेशातील पहिले आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले आहे.

भारताच्या नागरी हवाई क्षेत्र इतिहासातील, विमान दिशादर्शक सेवा मैलाचा दगड ठरली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि इस्रो ने संयुक्तपणे ती विकसित केली आहे. ही सुविधा आणि विमान दिशादर्शक सेवेचा वापर करणारे गोव्यातील दाबोळी विमानतळ पहिलेच ठरले आहे.

एलपीव्हीमुळे विमानांना जमिनीवर असलेल्या दिशादर्शक सुविधांची गरज भासत नाही. या सुविधेमुळे दाबोळीच्या अधुनिकतेत वाढ झाली आहे.

Dabolim Airport
नवरा गर्लफ्रेंडसोबत 5 दिवस गोव्यात होता, आरोप करत पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज; कोर्ट म्हणाले, 'हॉटेलचे रेकॉर्ड...'

काय आहे एलपीव्ही?

एलपीव्ही ( लोकलायझर परफॉर्मन्स विथ व्हरटीकल गाईडन्स) मुळे विमानांना कॅट- IILS च्या तुल्यबळ अशा वाहतुकीसाठी मार्गदर्शक प्रणाली उपलब्ध होते. त्यामुळे विमानांना जमिनीवर असलेल्या दिशादर्शक सुविधांची गरज भासत नाही. या सेवा, जीपीएस आणि इस्रोने अवकाशात पाठवलेल्या गगन भू-स्थिर उपग्रहांवर (जी-सॅट-8, जी-सॅट-10 आणि जी-सॅट-15) वर अवलंबून आहे.

दरम्यान, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मागील वर्षी राजस्थानच्या किशनगढ इथे गगन प्रणालीचा आधार घेत, एलपीव्ही सुविधेचा वापर याची यशस्वी चाचणी घेतली होती. अशी यशस्वी चाचणी करणारा, भारत आशिया - प्रशांत क्षेत्रातील पहिलाच देश ठरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com