Sateri Ravalnath Temple Khorlim  Dainik Gomantak
गोवा

Sateri Ravalnath Temple: सातेरी-रवळनाथ देवस्थानातील वाद मिटेना! पूजेसाठी भटजींची नेमणूक; तोडगा न निघाल्याने मामलेदारांचा निर्णय

Sateri Ravalnath Temple Khorlim: देवस्थानातील पूजेवरून निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही गटांना समोरासमोर चर्चा करण्यासाठी बोलाविले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: धुळापी-खोर्ली येथील सातेरी-रवळनाथ देवस्थानातील वादावर मामलेदारांसमोर चर्चा होऊनही तोडगा निघाला नाही. त्यामुळे सरकारच्या वतीने भटजींची नेमणूक करून देवस्थानात पूजा करण्याचा निर्णय सरकारच्या वतीने घेतल्याची माहिती मामलेदार गुरुप्रसाद तोरस्कर यांनी दिली.

देवस्थानातील पूजेवरून निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही गटांना समोरासमोर चर्चा करण्यासाठी बोलाविले होते. दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींनी आपली बाजू मांडली; पण या प्रस्तावांना दोन्ही बाजूंनी विरोध झाला. त्यामुळे अखेर पूजेसाठी भटजी नेमण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे तोरस्कर म्हणाले.

रवळनाथ देवस्थानच्या पूजेचा मान कोणाला, यावरून दोन गटांत काही दिवसांपूर्वी वाद झाल्यानंतर दोन्ही गटांवर निर्बंध घालून मंदिराला कुलूप ठोकले होते आणि दोन्ही गटांना त्या कुलुपाच्या चाव्या दिल्याचे मामलेदारांनी सांगितले. परंतु जल्मी कोकणी गावडे समाजाने मामलेदार कार्यालयात धाव घेतली.

यातील प्रतिनिधींनी सांगितले की, अनेक पिढ्यांपासून येथील देवस्थानचे धार्मिक विधी, पूजा अर्चा व परंपरागत देवस्थानचे कार्यक्रम जल्मी समाज करीत आला आहे. पण सध्या दोन समाजाच्या वादांमुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे. येत्या १४ तारखेला यावर सुनावणी होणार आहे.

आमदारांच्या सांगण्यावरून मामलेदारांची कृती

मंदिराला मामलेदारांनी कुलूप लावले आणि आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा आमच्याशी चर्चा न करता मामलेदारांनी मंदिराच्या कुलुपाची चावी दुसऱ्या समाजाला दिली. ज्यांना चावी देण्यात आली, त्या समाजाला स्थानिक आमदार राजेश फळदेसाई हे पाठिंबा देत असल्याचा आरोप काही सदस्यांनी केला. मामलेदारांचे कार्य हे आमदारांच्या सांगण्यावरून चालत असल्याचा आरोप कार्यालयाबाहेर उपस्थितांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa North: न्याय देत नसाल तर विष द्या ! पळसकट्टा, येथील धनगर समाज महिलांचा प्रकल्पाविरोधात संताप

Mandovi River: चोडण येथील बांध कोसळतोय! दुरुस्तीची मागणी,'मांडवी'चे पाणी फुटण्याचा धोका

Goa Weather Update: गोव्याला अवकाळी पावसाने झोडपले! उकाड्यापासून सुटका, वातावरणात पसरला गारवा

Bicholim Fire: डिचोलीत भरदिवसा फ्लॅटला आग; जीवितहानी टळली, दागिन्यांसह पंधरा लाखांचा ऐवज भस्मसात

Baina Fish Market: बायणा मासळी मार्केटची दुरवस्था; घाऊक विक्रेत्यांना हलवण्याच्या हालचालींवर स्थानिकांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT