Baina Fish Market: बायणा मासळी मार्केटची दुरवस्था; घाऊक विक्रेत्यांना हलवण्याच्या हालचालींवर स्थानिकांचा आक्षेप

Baina Fish Market Condition: बायणातील मासळी मार्केटची दुरवस्था कायम असताना खारीवाडा येथील घाऊक मासळी विक्रेत्यांना तेथे व्यवसाय करण्याचे आवाहन करण्यात आल्याने परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
Baina Fish Market Condition
Baina Fish Market ConditionDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: बायणातील मासळी मार्केटची दुरवस्था कायम असताना खारीवाडा येथील घाऊक मासळी विक्रेत्यांना तेथे व्यवसाय करण्याचे आवाहन करण्यात आल्याने परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आधी मार्केटची दुरुस्ती करूनच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी विक्रेते व नागरिकांकडून होत आहे.

शुक्रवारी (ता.२२) संबंधित अधिकाऱ्यांनी बायणा मार्केट व खारीवाडा परिसराची पाहणी केली होती. त्यावेळी शनिवारपासून कारवाई सुरू होईल, असा इशारा देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. केवळ मुरगाव पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन मोबाईलवर छायाचित्रे काढल्याचे सांगण्यात आले. या कारवाईमागील हेतू स्पष्ट न झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

Baina Fish Market Condition
Vasco New Fish Market: वास्कोतील मासळी मार्केट प्रकल्पावर पुन्हा प्रश्नचिन्ह, नियोजनाचा अभाव; नागरिकांमध्ये नाराजी

दरम्यान, खारीवाडा येथे काही घाऊक विक्रेते कमी दरात मासळी विक्री करत असल्याने ग्राहकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे बायणा मासळी मार्केटातील लहान विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा दावा स्थानिक विक्रेत्यांनी केला आहे. त्यामुळे घाऊक विक्री बंद करून सर्व विक्रेते बायणा मार्केटात हलवावेत, अशी मागणीही पुढे येत आहे.

दुसरीकडे, बायणा मासळी मार्केटची अवस्था अत्यंत खराब असल्याचे समोर आले आहे. छपराची मोडतोड, पावसाळ्यात पाणी साचणे, अस्वच्छता, अपुरी दिवाबत्ती, मोडलेली लोखंडी दारे आणि साफ न केलेली गटारे यामुळे बाजारात गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा स्थितीत विक्रेत्यांना स्थलांतर करण्याचा निर्णय कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Baina Fish Market Condition
Khariwada Fish Market : ...तर आम्ही रस्त्यावर मासे विक्री करू! मासळी विक्रेत्यांचा इशारा : नगराध्यक्षांनी दिले कारवाईचे आश्वासन

प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह!

मुरगाव पालिका मंडळाने ठराव घेतल्यानंतर मार्केटची पाहणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर दुरुस्तीच्या कामाला गती न मिळाल्याने नागरिकांत नाराजी आहे. आता पुन्हा अचानक स्थलांतराची सूचना दिल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com