

पेडणे: येथील श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या पुन: प्रतिष्ठा महोत्सवानिमित्त सोमवारी धर्म सभा विद्वत्संघ श्री मज्जगदगुरु पीठमचे राष्ट्रीय अध्यक्ष वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांच्या हस्ते शिखर कलश रोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी वैद्य उद्देशकिशोर सातवळेकर, श्री देवी भगवती रवळनाथ देवालय समितीचे अध्यक्ष रावराजे आदित्य देशप्रभु व रावराजे देवेंद्र देशप्रभु हे उपस्थित होते.
भाविकांच्या उपस्थितीत शक्ती मंडप कलश रोहण सोहळा श्री देवी भगवती,रवळनाथ व तदनुशांगिक देवालय समितीचे अध्यक्ष रावराजे आदित्य देशप्रभु यांच्या हस्ते झाला. सुमारे सहाशे वर्षानंतर श्री रवळनाथ पंचायतन दैवतांचा हा पुन : प्रतिष्ठा महोत्सव होत असल्याने देवस्थान समिती बरोबरच श्री रवळनाथ देवाचे पेडणे बरोबरच महाराष्ट्र व कर्नाटक व इतरत्र असलेल्या भाविकांमध्ये मोठा आनंद व उत्साह निर्माण झाला होता.
यावेळी श्री देवी भगवती, रवळनाथ व तदनुशांगिक देवालय समितीचे अध्यक्ष रावराजे आदित्य देशप्रभु म्हणाले की, सुमारे सहाशे वर्षांच्या काळानंतर श्री रवळनाथ मंदिराचा पुन : प्रतिष्ठा होत आहे.
अशा सोहळ्यावेळी मी देवस्थान समीतीच्या अध्यक्षपदी असल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. आमच्या देवस्थान समितीबरोबरच सगळ्या भाविकांचे सहकार्य व आशिवार्दाने हा सोहळा यशस्वी झाला.
आजच्या कलश रोहण सोहळ्यास ज्या प्रकारे भाविकांनी मोठ्याप्रमाणात उपस्थिती लावली तशाच प्रकारे उद्या सकाळी होणाऱ्या देवता प्रतिष्ठातत्वन्यास, प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमास लावावी असे आवानही त्यांनी यावेळी केले.
सोमवारी दुपारी राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. सुहास बुवा वझे यांच्या शिष्य ह .भ. प .कु. आकांक्षा अमोल प्रभू यांचे कीर्तन झाले. त्यांना हार्मोनियमसाठी नाना पटेकर व तबल्यासाठी तुळशीदास परब यांनी साथ संगत केली. संध्याकाळी विठ्ठल गावस, गीतेश इम्फाळकर, कपिल गावस यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मुंबईतील प्रख्यात गायक रघुनंदन पणशीकर व नंदिनी बेडेकर यांचा शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला. तबल्यासाठी त्यांना रोहिदास परब व हार्मोनियम साठी सुभाष पातर्फेकर यांनी साथ संगत केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.