

डिचोली: चोडण येथील ‘मांडवी’ नदीकाठचा ‘वारणा पात्रामोना’ बांध अत्यंत कमकुवत झाला असून, या बांधाची धडा कोसळू लागली आहे. या बांधाची वेळीच दुरुस्ती झाली नाही, तर बांध पूर्णपणे कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. बांध कोसळल्यास ‘मांडवी’चे पाणी बाहेर फुटून माडेलच्या दिशेने लोकवस्तीत घुसण्याची शक्यता वारणा पात्रामोना कूळ संघटनेने व्यक्त केली. चोडण फेरीधक्क्याला टेकून ‘मांडवी’ नदीकाठी जवळपास साडेतीनशे मीटर लांबीचा बांध बांधण्यात आला आहे.
मात्र, ‘मांडवी’तील पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे हा बांध दिवसेंदिवस कमकुवत होत आहे. या बांधाला तडे गेले असून, काही ठिकाणी बांधाची धडा कोसळली आहे. येत्या पावसाळ्यात या बांधाला अधिकच धोका संभवत आहे. या बांधाची दुरुस्ती करावी, अशी मागणी करणारे निवेदन वारणा पात्रामोना कूळ संघटनेने तिसवाडीच्या मामलेदारांना दिले आहे.
या निवेदनाची दखल घेत बांधाची दुरुस्ती करण्यासंबंधीचा आदेश संबंधीत खात्याला दिला आहे. आता या बांधाच्या दुरुस्तीकामाला कधीपासून सुरवात होते. त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.दरम्यान, आमदार शेट यांनी मुखमंत्र्यांची भेट घेऊन बांध दुरुस्तीचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला आहे.
मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी शुक्रवारी ‘वारणा पात्रामोना’ बांधाची प्रत्यक्ष पाहणी केली. नदी फुटीचा संभाव्य धोका ओळखून या बांधाची तातडीने दुरुस्ती करावी, असा त्यांचा आग्रह आहे. बांधाची दुरुस्ती करतानाच बांधाची धूप रोखण्यासाठी काँक्रिटची संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी आमदार शेट यांच्यासमवेत कृषी खात्याच्या माती संवर्धन विभागाचे अभियंता किरण पारकर आणि व्यवस्थापक राजेश नावेलकर यांच्यासह ‘वारणा पात्रामोना’ कूळ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.