मडगाव: मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या कोलवा येथील दोन मसाज पार्लरवर मंगळवारी रात्री छापे टाकून ९ युवतींची सुटका करण्यात आली. या प्रकरणात तीन महिलांना अटक करण्यात आली आहे. वेश्या व्यवसायात गुंतविलेल्या या युवती महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि मणिपूर येथून गोव्यात आणल्या होत्या, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
दोनपैकी एका एका पार्लरचे नाव ‘हॅपिनेस व्हील ग्रो युनिसेक्स सलून’ असे असून या पार्लरवर मानव तस्करी विरोधी पथकाने छापा टाकला. या ठिकाणाहून पाच युवतींची सुटका करण्यात आली. हे पार्लर चालविणाऱ्या राधिका शर्मा या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणात मडगावच्या मानव तस्करी विरोधी विभागाच्या पोलिस निरीक्षक सुदिक्षा नाईक या तपास करीत आहेत. दुसऱ्या पार्लरचे नाव ‘रॉयल स्पा’ असे असून ही जागा एका स्थानिकाकडून चालविण्यास घेतली होती, अशी माहिती पुढे आली आहे.
या पार्लरमधून चार युवतींची सुटका करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईत इशिता छोटू व चांदणी छोटू (दोघी राजस्थान) या महिलांना अटक केली. महिला तस्करी विरोधात काम करणाऱ्या ‘अर्ज’ या संघटनेच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
पार्लर बेकायदा...
कोलवा समुद्र किनाऱ्यापासून जवळच असलेली हे दोन्ही पार्लर्स बरीच वर्षे ती विनाव्यत्यय चालू होती. कोलव्यात येणाऱ्या पर्यटकांना काही दलाल या पार्लरची माहिती देत होते. जी पार्लर्स चालू आहेत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा परवाना नव्हता. असे असतानाही एवढे दिवस ही पार्लर्स बिनबोभाटपणे कशी चालू होती, यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मानव तस्करीबाबत तपास : टिकम सिंग वर्मा
दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांच्याशी संपर्क साधला असता, या पार्लरमधून सुटका करण्यात आलेल्या नऊही युवती ह्या परप्रांतीय असल्या तरी त्यातील काही युवती बराच काळ गोव्यात वास्तव करून होत्या.
त्या व्यवसायात कार्यरत होत्या. त्यामुळे अजून तरी या प्रकरणात मानव तस्करी हा कोन दिसून आलेला नाही. असे जरी असले तरी आम्ही सर्व कोनातूनही तपास करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.