Illegal Construction in Anjuna Dainik Gomantak
गोवा

Illegal Construction in Panaji: रस्त्यासाठी नुकसान भरपाई देऊनही सांतिनेज परिसरात अतिक्रमण!

वादग्रस्त बांधकाम : पणजी महापालिकेची परवानगीच नाही!

दैनिक गोमन्तक डिजिटल

Illegal Construction in St. Inez Panaji: सांतिनेजमधील ‘हमारा स्कूल’जवळील वळणावर अतिक्रमित जागेत उभारण्यात आलेल्या दुकान गाळ्यांच्या बांधकामांविषयी काही महत्त्वाच्या बाबी पुढे आल्या आहेत. या बाबी धक्कादायक असून ‘सब गोलमाल है भाई’ म्हणण्याची वेळ आता आली आहे.

या बांधकामासाठी महापालिकेची आवश्‍यक असणारी परवानगी घेतली नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्याशिवाय रस्ता रुंदीकरणासाठी या जागा मालकाला सरकारने जागेचा मोबदलाही दिला, पण संबंधित यंत्रणेने ती जागा ताब्यातच घेतली नाही, असेही आता सूत्रांनी सांगितले.

महापालिकेच्या अभियंत्यांनीही या बांधकामाला परवानगी घेतली नसल्याचे सांगितल्याने सर्व काही गोलमाल असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अनेक वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरणासाठी येथील दुकानमालकाला त्या जागेचा मोबदला दिला गेला असल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय रस्ता रुंदीकरणात ही दुकाने हटणार असून त्याची पूर्तता झाल्याची माहिती येथील नगरसेवकांना आहे.

परंतु महत्त्वाची बाब म्हणजे एखादे घर दुरुस्त करावयाचे झाल्यास त्यास महापालिकेची परवानगी घ्यावी लागते, पण या कामासाठी महापालिकेला विचारण्यातही आले नसल्याचे चर्चिले जाते.

संबंधित दुकानमालकाशी संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही.

महापालिका बडगा उगारणार का?

ताळगावात इंटरनॅशनल हॉटेल ते आदर्श चौक या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत होती. त्या वाहतूक कोंडीवर रस्ता रुंदीकरणाशिवाय पर्याय नव्हता, परंतु त्यावेळी आमदार बाबूश मोन्सेरात यांनी तो रस्ता रुंद करण्याचे काम काही दिवसांत पूर्ण करून घेतले होते.

बोरकर हॉटेलसमोरील या इंग्रजी ‘व्ही’ आकाराच्या चौकात रस्ता रुंदीकरण करण्याची गरज असताना त्याकडे आमदारांनी लक्ष घातले तर बरे होईल.

स्मार्ट सिटीची कामे सुरू असताना त्या कोपऱ्यावर खड्डा खोदण्यात आला आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होत असते. कोणतीही परवानगी न घेता बांधकाम करणाऱ्यांवर महापालिका बडगा उगारणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

  1. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेत बेकायदेशीर बांधकाम.

  2. रस्ता रुंदीकरणासाठी सरकारने जागेची नुकसान भरपाई दिली, पण जागेचा ताबाच घेतला नाही.

  3. तीन रस्त्यांच्या ठिकाणी वळणावरच बेकायदेशीर बांधकामामुळे रोजच वाहतूक कोंडी.

  4. रस्ता रुंदीकरणात बांधकाम हटविण्याची झाली होती पूर्तता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT