Bicholim News : केळबाई’ मंदिर खुले करा!

डिचोली मामलेदारांकडून देवस्थान समितीला निर्देश
Hari Naik Gavkar
Hari Naik GavkarGomantak Digital Team
Published on
Updated on

Bicholim News : मये येथील श्री केळबाई मंदिर ‘बंद’ प्रकरणाची देवालयाचे प्रशासक तथा डिचोलीचे मामलेदार राजाराम परब यांनी अखेर भाविकांकडून आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. उद्या मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत मंदिराचे दार उघडा, असे निर्देश त्यांनी आज श्री माया केळबाई पंचायतन देवस्थान समितीला दिले आहेत.

आज सायंकाळी कारणे दाखवा नोटीसही त्यांनी देवस्थान समितीला जारी केली आहे. निर्देशीत केलेल्या मुदतीत मंदिर खुले करण्यास टाळाटाळ झाल्यास देवस्थान कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे नोटिशीत स्पष्ट केले आहे. श्री केळबाई देवीचे मंदिर ४८ तासांच्या आत खुले करावे, असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांसह भाविकांनी देताच मंदिर खुले करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत.

Hari Naik Gavkar
IPL 2023: LSG चा अखेरच्या बॉलवर विजय! निकोसल-स्टॉयनिसच्या वादळापुढे RCB हतबल

भाविकांच्या भूमिकेकडे लक्ष

दिलेल्या मुदतीत मंदिर उघडण्यास प्रशासनाला अपयश आले, तर उत्सव साजरा करुन मंदिर उघडण्यात येईल, असा इशाराही हिंदुत्ववादी संघटनांसह भाविकांनी दिला आहे. भाविकांनी दिलेली मुदत संपण्यापूर्वीच प्रशासनाकडून मंदिर खुले करण्यात येते की नाही, ते मंगळवारी स्पष्ट होणार आहे.

Hari Naik Gavkar
Cavrem Mining Issue : कावरे खाणीच्या जनहित याचिकेवर 25ला सुनावणी

मामलेदारांना निवेदन

मंदिर ‘बंद'' प्रश्‍नावरून रविवारी हिंदुत्ववादी संघटनांच्या मार्गदर्शनाखाली मये येथे स्थानिक भाविकांची एक सभा झाली होती. या सभेत ठरल्याप्रमाणे सोमवारी डिचोलीचे मामलेदार राजाराम परब यांना मागणीचे निवेदन दिले. मामलेदारांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून सकारात्मक प्रतिसाद दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com