Cavrem Mining Issue : कावरे खाणीच्या जनहित याचिकेवर 25ला सुनावणी

जनसुनावणीची नवीन तारीख अजून घोषित केली नाही
Court | Goa Crime News
Court | Goa Crime News Dainik Gomantak
Published on
Updated on

Cavrem Quepem Mining Issue: कावरे-केपे येथील जांबळीगड डोंगरावर सुरू करण्यात येणाऱ्या लोह आणि मॅगनिज खाणीला स्थानिकांनी तीव्र विरोध करत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका सादर केली आहे. या खाणीची जनसुनावणी 11 रोजी ठेवण्यात आली होती.

परंतु ती जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केली असून त्याची नवीन तारीख अजून घोषित केली नाही. ही जनसुनावणी रद्द झाल्याने जनहित याचिकेवरील उच्च न्यायालयासमोरील सुनावणी येत्या 25 एप्रिलला ठेवण्यात आली आहे.

Court | Goa Crime News
Goa Traffic Police Accident: कार अपघातात पोलिस ठार; पाच कर्मचारी गंभीर

गाकुवेध फेडरेशनने ही जनहित याचिका सादर केली आहे. त्यांनी जनसुनावणीलाच आव्हान दिले होते. कावरे येथील लोह व मॅगनिज खाणीला पर्यावरण परवानासंदर्भात सुरू करण्यात येणारी ही सुनावणी कायमची रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कावरे येथील स्थानिकांच्या खाण असलेल्या परिसराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात शेती व बागायती आहेत.

दावे निकाली काढा

ज्या ठिकाणी ही खाण आहे, तो परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहे. या जमिनीवर अनेक लोकांची उपजीविका अवलंबून आहे.

या परिसरात वनाधिकार कायद्याखाली ज्या स्थानिकांनी दावे दाखल केले आहेत ते आधी निकालात काढावेत आणि हे दावे निकाली काढेपर्यंत दुसऱ्या कुठल्याही प्रस्तावाला मान्यता देऊ नये, यासाठी राज्य सरकारला आदेश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com