Goa Government| CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant on FIR: मी खेद व्यक्त करतो..! बिहारमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर काय म्हणाले मुख्यमंत्री; वाचा सविस्तर

गोव्यातील गुन्हेगारीवरून बिहारच्या कामगारांबाबत केले होते वक्तव्य

Akshay Nirmale

Goa CM Pramod Sawant on FIR against him: बिहारी कामगारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याविरोधात पाटणा येथे गुन्हा दाखल झाला आहे. त्यावर मुख्यमंत्री सावंत यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो, असे म्हणत त्या दिवशी नेमके काय वक्तव्य केले होते, हे त्यांनी सविस्तर सांगितले आहे.

सावंत म्हणाले की, गुन्हा दाखल केल्याचे मला सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातून कळले. सत्य हेच आहे की, एक मे रोजी कामगार दिनानिमित्त आम्ही गोव्यात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात माझे भाषण कोकणी भाषेतून झाले होते.

त्याच कार्यक्रमात मी सर्व राज्यातील कामगारांचा सन्मान करण्यात आला होता. माझ्या भाषणाला काही राजकीय लोकांनी, नेत्यांनी ट्विटस्ट करून मोडून तोडून सांगितले गेले आहे.

मला वाटतंय माझ्या भाषणाचा व्हिडिओ पुन्हा एकदा ऐकावा आणि कोकणी समजून घ्या. गोव्यात सर्व राज्यातील कामगार आहेत. अशा राज्याबाहेर कामगारांसाठी गोवा सरकारने लेबर कार्ड ही योजना आणली आहे. त्या भाषणात तेच मी सांगत होतो. गोव्यात गुन्हा घडता कामा नये.

गुन्हा घडल्यास गुन्हेगारांना शोधणे सोपे जावे, यासाठी लेबर कार्ड उपयोगी ठरणार नाही. या विषयीच बोलताना मी परप्रांतीय, स्थलांतरीत कामगारांबाबत वक्तव्य केले होते. अशा कामगारांकडून कुठला गुन्हा घडला तर तर त्यांना शोधण्यासाठी असे लेबर कार्ड गरजेचे आहे, हेच मी माझ्या कोकणी भाषेतील भाषणातून सांगितले होते.

सावंत म्हणाले की, कळत नकळत कुठल्या राज्यातील कामगारांना दुखावले असेल तर माझा उद्देश तसा नव्हता, हे लक्षात घ्या. तरीही एखादे राज्य, एखाद्या राज्याचे नेत यांना वाईट वाटले असेल किंवा त्यांच्या भावना दुखावल्या असलीत, तर मी खेद व्यक्त करतो. गोवा सरकारने नेहमीच सर्वांना आदर दिला आहे.

यापुढेही बाहेरील कामगारांचा आदर केला जाईल. अशा कामगारांना लेबर कार्ड योजना, इतर कामगार योजनांचा लाभ दिला जाईल. राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठीही कामगारांकडे लेबर कार्ड असले पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT