Birla Mandir in Goa: बिर्ला ग्रुपने गोव्यात साकारले भव्य, सुंदर राधाकृष्ण मंदिर; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

दक्षिण गोव्यात मंदिराची झाली प्राणप्रतिष्ठा; लवकरच भाविकांसाठी होणार खुले
Birla Mandir in Goa | CM Pramod Sawant
Birla Mandir in Goa | CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

Birla's Radha Krishna Mandir in Goa: गोवा हा जसा स्वच्छ, सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे, तसाच तो येथील मंदिरांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. गोव्यातील मंगेशी, महालसा (वेर्णा), शांतादुर्गा ही मंदिरे प्रसिद्ध आहेत.

गोव्याच्या या मंदिरांच्या वैभवात आता आणखी एका मंदिराची भर पडणार आहे. बिर्ला ग्रुपने गोव्यात भव्य आणि सुंदर असे राधाकृष्ण मंदिर बांधले आहे. त्यामुळे यापुढील काळात गोव्यातील पर्यटनात हे मंदिर देखील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

Birla Mandir in Goa | CM Pramod Sawant
गोव्याच्या परिवहन विभागाकडे ना कमर्शियल वाहनांचा डेटा, ना महसूल; काँग्रेसकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी...

दक्षिण गोव्यातील झुआरी नगर येथे बिर्ला ग्रुपने बांधलेल्या राधाकृष्ण मंदिराची आज, बुधवारी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. परमपूज्य ज्योतिष पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामीश्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या प्राणप्रतिष्ठा झाली. यावेळई गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत देखील उपस्थित होते.

गोव्यात सुंदर आणि भव्य राधाकृष्ण मंदिर बांधल्याबद्दल बिर्ला समूहाचे अभिनंदन आणि आभार मानतो, असे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

Birla Mandir in Goa | CM Pramod Sawant
Mopa Taxi Driver Protest: मोपा येथे जमावबंदीनंतरही टॅक्सीचालकांचे आंदोलन सुरूच

बिर्ला ग्रुपने देशभरात बांधलेली मंदिरे प्रसिद्ध आहेत. तसे मंदिर बिर्ला ग्रुपने आता गोव्यातही उभारले आहे. सांकवाळ येथील पठारावर हे मंदिर बांधण्यात आले आहे. त्यामुळे या ओसाड भागाचे एका महत्वाच्या पर्यटन केंद्रात रूपांतर होणार आहे.

तीन वर्षांपुर्वी या मंदिराच्या बांधकामाला सुरवात झाली होती. सफेद मार्बलमध्ये बांधलेले हे मंदिर पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. या मंदिराचे स्थापत्यही आकर्षक आहे. मंदिरासभोवतालचा परिसरही बगिचा, फुलझाडे यांनी नटला आहे. तसेच रात्रीच्या वेळी दीपांमुळे हा सर्व परिसर उजळून निघतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com