FIR Against Goa CM: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात पाटण्यात गुन्हा दाखल; बिहारमध्ये येऊन माफी मागा...

जनता दल युनायडेटच्या नेत्याने दाखल केली होती तक्रार, सावंत यांनी कामगार दिनी केले होते वादग्रस्त वक्तव्य
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

Complaints Against Goa CM Pramod Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याविरोधात पाटणा (बिहार) येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी एक मे रोजी कामगार दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात परप्रांतीय बिहारी कामगारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडचे नेते मनिष सिंह यांनी ही तक्रार दाखल केली असून त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बिहारमध्ये येऊन आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल बिहारींची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

CM Pramod Sawant
Birla Mandir in Goa: बिर्ला ग्रुपने गोव्यात साकारले भव्य, सुंदर राधाकृष्ण मंदिर; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

मनिष सिंह यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्रीसारख्या जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने अशी वक्तव्ये करू नयेत. अशी वक्तव्ये करून लोकांना आपापसात भांडण लावण्याचा प्रयत्न करू नये. जर प्रमोद सावंत यांनी माफी मागितली नाही तर त्यांना कोर्टात येऊन उत्तर द्यावे लागेल.

ते म्हणाले की, बिहारमधील लोक त्यांच्या क्षमतेच्या जोरावर राज्याबाहेर राहतात. आपल्या प्रतिभेच्या बळावर बिहारी लोकांनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपला ठसा उमटवला आहे.

देशातील अनेक आयएएस, आयपीएस आणि आयआयटी अभियंते बिहारमधून बनलेले आहेत. हे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती करून घ्यावे.

CM Pramod Sawant
Francisco Sardinha: चर्चिल आता निवडून येणे शक्य नाही; कुडतरी किंवा बाणावलीतुनही नाही!

काय म्हणाले तेजस्वी यादव?

दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यानंतर आता गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी बिहारी जनतेचा अपमान केला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे हे वक्तव्य लाजिरवाणे आहे.

त्यांनी बिहार आणि बिहारच्या जनतेचा अपमान केला आहे. भाजप नेते बिहारच्या लोकांचा इतका द्वेष का करतात? केंद्रातील भाजप सरकारही बिहारच्या हक्कांबाबत उदासीन आहे.

काय म्हणाले होते प्रमोद सावंत?

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले होते की, गोव्यातील बहुतांश गुन्हे हे यूपी-बिहारमधील लोक करतात. गोव्यातील 90 टक्क्यांहून अधिक गुन्ह्यांमध्ये येथील परप्रांतीय असलेल्या बिहारमधील मजुरांचा सहभाग असतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com