Goa University Paper Leak Scam Dainik GOmantak
गोवा

Goa University: ‘चोरीचा अहवाल फुटला कसा?’ विद्यापीठ शिक्षक संघटनेच्या बैठकीत 4 तास खल

Goa University Paper Leak Scam: सर्वसाधारण सभा सुरू होती. हे प्रकरण संवेदनशील आहे. अहवाल कुलपतींपर्यंत पोचला असतानाच तो माध्यमांपर्यंत पोचलाच कसा, यावर बराच वेळ खल करण्यात आला.

Sameer Panditrao

पणजी: गोवा विद्यापीठ प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणाचा चौकशी अहवाल ‘गोमन्तक’ने फोडल्याची मोठी दखल विद्यापीठ वर्तुळात घेण्यात आली आहे. गोवा विद्यापीठ शिक्षक संघटनेच्या (गुटा) आज चार तास चाललेल्या सर्वसाधारण सभेत या विषयावरून गरमागरम चर्चा झाली.

मात्र, या बैठकीतील कामकाजाची माहिती पत्रकार परिषद घेऊन देऊ, असे सांगत संघटनेचे अध्यक्ष प्रा. रामराव वाघ यांनी वेळ मारून नेली.

एकीकडे विधानसभेत विद्यापीठाच्या कारभाराची चिरफाड होत असतानाच विद्यापीठाच्या ‘फॅकल्टी ब्लॉक बी’मध्ये ही सर्वसाधारण सभा सुरू होती. हे प्रकरण संवेदनशील आहे. अहवाल कुलपतींपर्यंत पोचला असतानाच तो माध्यमांपर्यंत पोचलाच कसा, यावर बराच वेळ खल करण्यात आला. याचवेळी काहीजणांनी कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन यांनी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीतील आक्षेपार्ह मुद्यांवर भाष्य करणे सुरू केले. त्‍यावेळी कुलगुरूंच्या म्हणण्याचा विपर्यास केला असे सांगून वेळ मारून नेण्याची वेळ बैठकीत आली.

विद्यापीठातील पेपर फुटीचे प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल सरकार दरबारी सादर केला असता, त्यावर योग्य ती अधिकृत टिप्पणी अजून झालेली नसताना या प्रकरणातील अहवाल फुटून तो माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला. हे प्रकरण संवेदनशील असता अशा प्रकारे अहवालावर माध्यमांनी भाष्य करणे आक्षेपार्ह असल्याची चर्चा आजच्या सभेत झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

या सभेत प्रामुख्याने विद्यापीठ तसेच येथील प्राध्यापकांना वारंवार लक्ष्य केले जाणे, कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन यांची स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली मुलाखत आणि प्राध्यापकांवर माध्यमांनी केलेल्या टिप्पणी, शैक्षणिक कर्मचाऱ्यांची प्रशासकीय कामांसाठी करण्यात येणारी नियुक्ती, श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम खासगी संस्थेला चालविण्यासाठी देण्याचा प्रस्ताव आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेवेळी स्टेडियम खासगी संस्थेला चालवण्यास देताना गोवा विद्यापीठाचे हित जपले जाईल, असे सरकारने आश्वासन दिल्याचे सांगत बैठक आटोक्यात आणण्यात आली.

कुलगुरूंच्या ‘टिप्पणी’वर ‘पांघरूण’

पेपर फुटी प्रकरणातील अहवाल अजून राज्यपालांना सादर करण्यात आला आहे. असे असताना त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणे प्रलंबित आहे. अशा प्रकारे विद्यापीठाच्या नावाची बदनामी होत असल्याची चर्चा यावेळी झाल्याची माहिती आहे. कुलगुरू प्रो. मेनन यांची एका स्थानिक वृत्तपत्रात जी मुलाखत प्रसिद्ध झाली, त्यात शिक्षकांवर टिप्पणी होती. परंतु यात कुलगुरूंच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, त्यांना ‘मिस कोट’ करण्यात आले आहे, अशी चर्चा झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mike Mehta: 3 दशकांहून अधिक योगदान देणारे तियात्रकार, ‘गोंयकार’पणाचे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व - माइक मेहता

अग्रलेख: 'वाळू माफिया' अनावर झाल्यास लोकांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचे? कुंपणच शेत खाणारी परिस्थिती

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; आरोप निश्चित करण्याचे म्हापसा कोर्टाचे आदेश

Oceanman Controversy: ‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? 'ओशनमन'वरुन फेरेरांचा सवाल; पर्यटनमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी

Goa Today's News Live: वाळपईत घराला आग; बाईक, वॉशिंग मशीन आणि शेड जळून खाक

SCROLL FOR NEXT