amit palekar new Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: "आम्हाला कोणी बोलावलंच नाही",फातोर्डा मेळाव्यावर पालेकरांचा खुलासा; 'आप'शिवाय विरोधी पक्षांची एकजूट?

Amit Palekar Fatorda Meet: भाजपला हरवण्यासाठी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी उद्देश शुद्ध असेल, तर 'आप' आघाडीसाठी तयार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे

Akshata Chhatre

पणजी: गोव्यातील विरोधी पक्षांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला फातोर्डा येथील श्रीकृष्ण विजयोत्सवाच्या व्यासपीठावर एकत्र येत भाजपविरोधात (BJP) वज्रमुठ बांधली असताना, या मेळाव्याला गैरहजर राहिलेल्या आम आदमी पक्षाचे गोवा अध्यक्ष अमित पालेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपला हरवण्यासाठी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी उद्देश शुद्ध असेल, तर 'आप' आघाडीसाठी तयार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे.

'आम्ही बोलावण्याची वाट पाहत नाही'

फातोर्डा येथील विरोधी पक्षांच्या मेळाव्याला सर्वजण हजार होते मात्र 'आप' गैरहजर का? असा प्रश्न अनेकांना पडला होता, आता मात्र या प्रश्नावर पालेकर यांनी खुलासा केलाय . ते म्हणाले, "२ ऑक्टोबरच्या दोन आठवड्यांपूर्वीच आम्ही सांगितले होते की, आम्ही आघाडीसाठी तयार आहोत, पण त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे लागेल. पण, त्यांनी आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. कालही (मेळाव्याच्या दिवशी) आम्हाला बोलावण्यात आले नव्हते."

मात्र, बोलावले नसले तरी आपण दुःखी नाही, तर आनंदी आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. पालेकर म्हणाले, "जे झाले ते गोव्यासाठी चांगले आहे. आम्ही आमंत्रित नाही म्हणून दुःखी नाही, तर गोव्यासाठी सर्वजण एकत्र येत आहेत, याचा आम्हाला आनंद आहे."

'नरकासुरांना हरवण्यासाठी एकजूट हवी'

भाजपला आणि भ्रष्टाचाराला हरवण्यासाठी उद्देश चांगला असणे ही आमची एकमेव अट आहे, असे पालेकर यांनी ठामपणे सांगितले.

फातोर्डा मेळाव्यात काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सत्ताधाऱ्यांना '३३ नरकासुर' संबोधले होते. त्यावर पालेकर यांनीही सूचक विधान केले. ते म्हणाले, "आमच्या पक्षाने कधीही आघाडी करण्यास नकार दिला नाही, आमचा एकमेव वाद हा आहे की उद्देश योग्य असला पाहिजे - भाजप आणि भ्रष्टाचाराला हरवण्यासाठी."

दरम्यान, फातोर्डा येथील मेळाव्यात युरी आलेमाव यांच्यासह गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई आणि रेव्होल्यूशनरी गोवन्सचे मनोज परब हे नेते एकत्र आले होते. या एकजुटीमुळे भाजपविरोधी मत विभागणी थांबवण्यावर आता 'आप'चा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मैं नहीं खाउंगा, मोटा हो जाउंगा" जयस्वाल केक घेऊन आला, पण 'हिटमॅन'ने दिला नकार Watch Video

Goa Politics:"सकाळी येतो सांगून तुकाराम आलाच नाही!", RGP प्रमुखांनी काँग्रेसला पुन्हा टाळले? युतीचा 'सस्पेन्स' वाढला

Goa Nightclub Fire: हडफडे नाईट क्लब दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई: चार व्यवस्थापक अटकेत, मालकाचीही चौकशी होणार

Gautam Gambhir: "ते दोघे बऱ्याच काळापासून..." मालिका जिंकल्यानंतर गौतम गंभीर 'रो-को'बाबत काय म्हणाला?

Goa Live News: हडफडे दुर्घटनेप्रकरणी रोशन रेडकर यांना चौकशीसाठी बोलावले; हणजूण पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांची गर्दी

SCROLL FOR NEXT