goa opposition leaders
goa opposition leaders Dainik Gomantak

Goa Politics: "हे 33 नरकासुर गोवा जाळतील", श्रीकृष्ण विजयोत्सवात विरोधी पक्षांची वज्रमुठ; सत्ताधारी पक्षासमोर मोठे आव्हान?

Goa opposition unity fatorda vijayotsav: गोव्यातील विरोधी पक्षांनी दिवाळीच्या आदल्या रात्री फातोर्डा येथील श्रीकृष्ण विजयोत्सवाच्या व्यासपीठावर एकत्र येत, सत्ताधारी भाजप पक्षाला एक स्पष्ट संदेश दिला
Published on

फातोर्डा: गोव्यातील विरोधी पक्षांनी दिवाळीच्या आदल्या रात्री फातोर्डा येथील श्रीकृष्ण विजयोत्सवाच्या व्यासपीठावर एकत्र येत, सत्ताधारी भाजप पक्षाला एक स्पष्ट संदेश दिला आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई आणि रेव्होल्यूशनरी गोवन्सचे अध्यक्ष मनोज परब यांनी यावेळी राजकीय मतभेद विसरून गोव्याच्या हितासाठी एक होण्याची गरज व्यक्त केली.

"विभागून राहिल्यास ३३ नरकासुर गोव्याला जाळतील"

युरी आलेमाव यांनी यावेळी सत्तेतील लोकांना 'नरकासुर' संबोधले. ते म्हणाले, "विधानसभेत आम्ही विरोधी पक्षात एकजूट आहोत. आम्ही गोव्यासाठी आमचे अहंकार बाजूला ठेवले आहेत. विधानसभेच्या बाहेरही एक स्पष्ट संदेश गेला पाहिजे; जर आपण विभागलेले राहिलो, तर हे ३३ नरकासुर (सत्ताधारी) गोव्याला जाळून टाकतील."

आलेमाव यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांनाही सज्ज राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "आपल्यातही नरकासुर आहेत आणि त्यांना मी सांगतो की, गोव्याला वाचवण्याची वेळ अजून गेलेली नाही. लोकांची प्रतिक्रिया पाहता एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे." जे लोक त्यांच्याच पक्षातील गैरकृत्ये स्वीकारू शकत नाहीत, त्यांनी पक्ष सोडावा आणि गोमंतकीय म्हणून एकत्र यावे, असे स्पष्ट आवाहन आलेमाव यांनी केले.

goa opposition leaders
Goa Politics: 'मगोपमध्ये जाणार काय'? आजगावकर म्हणाले 'मग पाहू'; ढवळीकरांना अजूनही नेता मानत असल्याचे दिले उत्तर

"गोव्यासाठी जुने वाद विसरा"

विजय सरदेसाई यांनी गोमंतकीयांच्या समस्यांवर बोट ठेवत राजकीय पक्षांना जागे होण्याची गरज व्यक्त केली. सरदेसाई म्हणाले की, आज गोमंतकीयांना किंमत दिली जात नाहीये. त्यांना रोजगार, व्यवसायासह अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे आणि आपल्या पुढच्या पिढ्या धोक्यात आहेत.

ते म्हणाले, "माझ्यामध्ये आणि मनोजमध्ये अनेक मतभेद होते, आम्ही एकमेकांवर टीका केली. पण गोव्यासाठी, जुने वाद विसरूयाम्हणूनच आज आम्ही एकत्र आलो आहोत." काही बाहेरचे लोक विरोधी पक्षांना लक्ष्य करून मोठी विधाने करतात, पण त्यांचे भविष्य काय आहे, हे आम्हाला माहीत आहे, असे म्हणत सरदेसाई यांनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. फातोर्डाच्या या श्रीकृष्ण विजयोत्सवात विरोधी पक्षांच्या नेत्यांची ही उपस्थिती गोव्याच्या राजकारणात एका मोठ्या बदलाचे संकेत देत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com