Goa Kala Academy Controversy Dainik Gomantak
गोवा

Goa Kala Academy: आता 'त्या' कर्मचाऱ्यांवर 'एफआयआर' नोंदवा, 'कला राखण'ची अध्यक्षांकडे मागणी

Goa Kala Academy Controversy: ‘नाट्य स्पर्धा निकाल निश्चितीसाठी आमिष दाखवल्याप्रकरणी त्या कर्मचाऱ्यांवर ‘एफआयआर’ नोंदवा, अशी मागणी ‘गोवा कला राखण मांड’ च्या सदस्यांनी कला अकादमीचे अध्यक्ष बाबू कवळेकर यांच्याकडे केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: ‘नाट्य स्पर्धा निकाल निश्चितीसाठी आमिष दाखवल्याप्रकरणी त्या कर्मचाऱ्यांवर ‘एफआयआर’ नोंदवा, अशी मागणी ‘गोवा कला राखण मांड’ च्या सदस्यांनी कला अकादमीचे अध्यक्ष बाबू कवळेकर यांच्याकडे केली.

या प्रकरणाबद्दल कला अकादमीने काय उपाययोजना केल्या आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न या सदस्यांनी केला. कला अकादमी कशाप्रकारे त्यांची चौकशी करत यासंदर्भात सदस्यांनी अध्यक्षांना प्रश्नही विचारले. त्यावर कवळेकर यांनी हे प्रकरण कला अकादमीने गांभिर्याने घेतले असून चाैकशी सुरु असल्याचे सांगितले. 

कवळेकर म्हणाले, की त्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस जारी केलेली आहे. दोघांकडूनही संबंधित कामाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. ‘त्या ’दोघांपैकी एक कर्मचारी मूळ कला आणि संस्कृती संचालनालयाचा कर्मचारी असल्याने कला आणि संस्कृती संचालनालय देखील या प्रकरणाचा एक प्रकारे भाग बनले आहे व त्यांनादेखील या प्रकरणाबद्दल कळवले आहे .

त्याचबरोबर महाराष्ट्राच्या संस्कृती कार्य कला मंडळाला पत्र लिहून त्यांच्याकडूनही माहिती मागवण्यात आली आहे. दरम्यान, अध्यक्ष कवळेकर यांनी गोवा कला राखण मांडच्या अनेक सूचनांना आज सकारात्मक प्रतिसाद दिला.‌

कर्मचाऱ्यांचा स्पर्धेत भाग नकोच

कला अकादमी आयोजित विविध स्पर्धा निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी कला अकादमीने त्यांचा पूर्वीचा नियम पुन्हा‌ लागू करून आपल्या कर्मचाऱ्यांना स्पर्धेत भाग घेण्यास मनाई करावी ही मागणीही ‘कला राखण’ ने केली आहे.

परीक्षकांना लाच देण्याचे प्रकरण अलीकडेच उघडकीस आले असले तरी परीक्षकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांकडून यापूर्वीही झालेला असल्याचे लक्षात आणून देण्यात आले. आता अशा प्रकरणांवर नियंत्रण आणण्यासाठी कला अकादमीने उच्च पातळीवर एक चौकशी समिती नेमावी, अशी सूचना सदस्यांनी केली.

चौकशी समितीवर स्पर्धेपासून दूर असलेल्या ज्येष्ठ कलाकारांची नेमणूक व्हावी, जेणेकरून योग्य प्रकारे अशा प्रकरणांसंबंधी अहवाल तयार होऊ शकेल, असेही सदस्यांनी यावेळी अध्यक्षांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT