Goa Politics: मनोज-विजय यांच्यात आरोप - प्रत्यारोप! आंदोलनादरम्यान नेमके काय घडले? Watch Video

Vijai Sardesai Manoj Parab Dispute: फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सोमवारी आंदोलनावेळी घेतलेल्या भूमिकेवर रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजीपी) अध्यक्ष मनोज परब यांनी टीका केली.
Vijai Sardesai Manoj Parab Dispute
Vijai Sardesai Manoj Parab DisputeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सोमवारी आंदोलनावेळी घेतलेल्या भूमिकेवर रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजीपी) अध्यक्ष मनोज परब यांनी टीका केली. या टीकेमुळे आरजीपी आणि गोवा फॉरवर्ड पक्षातील वाद विकोपाला गेला. दोन्ही नेत्यांकडून टीसीपीशी संबंधित मुद्द्यांवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

सोमवारच्या आंदोलनावेळी सरदेसाई यांनी जी भूमिका घेतली, जे वक्तव्य केले त्यावर परब म्हणाले, कोण कोणाचा मित्र आहे ते दिसून आले. मी जे वक्तव्य केले होते, ते सर्व विरोधी आमदारांना उद्देशून नव्हते तर विशेषतः सरदेसाई यांना उद्देशून होते. टीसीपी कलम ‘१६-ब’ लागू करून गोव्यात मोठ्या प्रमाणात जमीन रूपांतरण करण्यास आमदार सरदेसाई जबाबदार आहेत.

‘१६-ब’मुळे, जमीन रूपांतरण आणि झोन बदलांमुळे मोठ्या प्रमाणात लोक जमिनी गमावत आहेत. आमदार सरदेसाई यांनी ‘१६-ब’ आणून गोवा नष्ट केला, म्हणूनच ते आमच्यासोबत नाहीत, असा आरोप परब यांनी केला. जमीन रूपांतरण, जमीन व्यवहार आणि झोन बदलांमध्ये सहभागी असल्याचा आरोप त्यांनी सरदेसाईंवर केला.

Vijai Sardesai Manoj Parab Dispute
Goa Politics: 'वीरेश बोरकरना पोलिसांनी का हटवले'? CM सावंतांनी दिले उत्तर; लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याबाबत केले आवाहन

परब यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना आमदार सरदेसाई यांनी सोमवारी सायंकाळी आंदोलनावेळी जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेचे समर्थन केले. लोकप्रतिनिधींनी निषेधांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची सुरक्षितता आणि प्रतिष्ठा जपली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. लोकप्रतिनिधी म्हणून माझे मत आहे, की लोकांना जनावरांसारखे वागवले जाऊ नये. जनता ही प्राणी नाही, हे लक्षात घ्यावे.

Vijai Sardesai Manoj Parab Dispute
Goa Politics: खरी कुजबुज; महाआंदोलनाचा पुढचा टप्पा काय?

अलीकडच्या निषेधादरम्यान, महिला आणि मुलांसह मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती पाहता त्यांची सुरक्षितता आणि जबाबदारीचा विचार होणे आवश्यक आहे. काल जेव्हा महिला आणि मुले निषेधाचा भाग होती, तेव्हा तेथे मोठी गर्दी होती. त्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची जबाबदारी घेणे आपले कर्तव्य आहे, असे सरदेसाई यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com