ST Reservation: प्रियोळमध्ये एसटी आरक्षणाला विरोध; 3 हजार मतदारांच्या सह्यांसह राज्यपालांना निवेदन

Priol ST Reservation Opposition: निवेदन सादर करण्यासाठी प्रत्यक्षात समीर नाईक, विनय गावकर, दिनेश वेलिंगकर, गजानन प्रभुगावकर हे चार सदस्य राज्यपालांच्या भेटीस गेले होते.
Priol ST Reservation Opposition
ST ReservationDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: प्रियोळ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव ठेवण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शवत प्रियोळमधील नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने शुक्रवारी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. प्रियोळ मतदारसंघात विविध समाजांचे नागरिक मोठ्या संख्येने राहत असून, केवळ एका समाजासाठी राजकीय आरक्षण लागू केल्यास अन्य समाजांतील मतदारांवर अन्याय होईल, अशी भूमिका या नागरिकांनी मांडली.

त्यामुळे प्रियोळ मतदारसंघ एसटी प्रवर्गासाठी राखीव करू नये, अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली. राज्यपालांनी निवेदन स्वीकारून नागरिकांच्या तक्रारी आणि आक्षेप तपासून पाहण्याचे आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. निवेदन सादर करण्यासाठी प्रत्यक्षात समीर नाईक, विनय गावकर, दिनेश वेलिंगकर, गजानन प्रभुगावकर हे चार सदस्य राज्यपालांच्या भेटीस गेले होते.

Priol ST Reservation Opposition
ABVP Goa University Election: गोवा विद्यापीठात अभाविपचा क्लीन स्वीप; सर्व 9 जागांवर विजय, एनएसयूआयचा धुव्वा

मात्र, आवश्यकता भासल्यास सुमारे ५०० लोक एकत्र आणण्याची क्षमता असल्याचा दावा त्यांनी केला. आरक्षणाच्या प्रस्तावाविरोधात आतापर्यंत २,५०० ते ३,००० मतदारांच्या सह्या गोळा केल्याची माहिती त्यांनी दिली. विशेष म्हणजे, या सह्यांमध्ये एसटी समाजातील काही मतदारांचाही समावेश आहे.लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजातील उमेदवाराला निवडणूक लढविण्याची संधी मिळाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

आधी आर्थिक सर्वेक्षण करा

आरक्षणाचा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने सर्व समाजांचे आर्थिक सर्वेक्षण करावे. कोणत्या समाजातील किती कुटुंबे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, त्यांची राहणीमानाची स्थिती काय आहे आणि कोणाला सरकारी मदतीची गरज आहे, याचा अभ्यास करावा, अशी मागणीही त्यांनी केली. गरीबी ही कोणत्याही एका समाजापुरती मर्यादित नसून सर्व समाजांत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे आहेत. त्यामुळे शिक्षण, रोजगार आणि अन्य कल्याणकारी योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Priol ST Reservation Opposition
One Goa Project Stay: कारापूरमधील 'लोढा' प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; बांधकामासह परवानग्यांना स्थगिती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.