ABVP Goa University Election: गोवा विद्यापीठात अभाविपचा क्लीन स्वीप; सर्व 9 जागांवर विजय, एनएसयूआयचा धुव्वा

Goa University Student Council Results: गोवा विद्यापीठाच्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी झालेल्या विद्यार्थी परिषद निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) सर्वच्या सर्व नऊ जागांवर विजय मिळवला.
Goa University Student Council Results
ABVP Goa University ElectionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोवा विद्यापीठाच्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी झालेल्या विद्यार्थी परिषद निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) सर्वच्या सर्व नऊ जागांवर विजय मिळवला. या विजयामुळे गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळावर अभाविपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

दुसरीकडे, गेल्या वर्षी विद्यार्थी मंडळावर निवडून आलेल्या एनएसयूआयला यंदा एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे एनएसयूआयला विद्यार्थी मंडळातून पायउतार व्हावे लागले आहे. नवनिर्वाचित कार्यकारिणीत अध्यक्षपदी कल्पेश वाळके, सचिवपदी श्रेयांश नाईक, तर महिला प्रतिनिधीपदी पूर्वी परब यांची निवड झाली आहे. सभासदपदी अनिश गावस देसाई, अर्थिकेश नाईक, माधव देसाई, निधी मळीक, सावळो शेट आणि व्यंकटेश उपाख्य श्रेयस शेट वेर्णेकर हे विजयी झाले आहेत.

Goa University Student Council Results
One Goa Project Stay: कारापूरमधील 'लोढा' प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; बांधकामासह परवानग्यांना स्थगिती

दिल्ली विद्यापीठापासून गोवा विद्यापीठापर्यंत ''जेन झी'' पिढीतील विद्यार्थी आता केवळ बघ्याची भूमिका न घेता राष्ट्रवादी विचारसरणी आणि राष्ट्रउभारणीच्या ध्येयाने विद्यार्थी नेतृत्वाची धुरा सांभाळण्यासाठी पुढे येत आहेत. हा अभाविपसाठी अभिमानाचा क्षण असून तरुण पिढीच्या बदलत्या आकांक्षांचे प्रतीक आहे, असे अभाविपचे कोकण प्रदेश मंत्री राहुल राजोरिया यांनी सांगितले.

सर्व नऊ जागांवरील विजयामुळे नवनिर्वाचित प्रतिनिधींवर विद्यार्थी हिताची मोठी जबाबदारी आली आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणे, शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी नवनिर्वाचित कार्यकारिणी कटिबद्ध राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

गोवा विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अभाविप गोवाचे अभिनंदन केले. गोवा विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी स्पष्ट कौल देत प्रगतीशील, महत्त्वाकांक्षी आणि राष्ट्रनिर्माणाच्या भावनेवर आधारित दृष्टिकोनावर विश्वास दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेला 'विकसित गोवा, विकसित भारत' हा संकल्प तरुणाईने मनापासून स्वीकारला असल्याचे या निकालातून दिसून येते, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Goa University Student Council Results
Goa Politics: 'गोवा फॉरवर्ड'च्या विलिनीकरणाचा प्रस्ताव आल्यास काँग्रेस तयार; माणिकराव ठाकरे यांचे संकेत

अभाविपला भरघोस मतांनी सर्व जागांवर निवडून दिल्याबद्दल राज्यातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांतील विद्यार्थी प्रतिनिधी तसेच विद्यार्थ्यांचे मी आभार मानतो. हा विजय विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा आहे. विद्यार्थी हिताच्या दृष्टीने आम्ही यापुढेही कार्यरत राहू."

- कल्पेश वाळके, नवनिर्वाचित अध्यक्ष.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.