

Budh Gochar Vrishchik Rashi 2 December 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीत होणारे बदल आपल्या दैनंदिन आयुष्यावर आणि कामावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतात. पंचांगानुसार, बुध ग्रह लवकरच आपली रास बदलणार आहे. सध्या बुध तुळ राशीत असून 2 डिसेंबर 2026 रोजी, बुधवारी सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी तो तुळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करेल. ज्योतिषात बुधाला बुद्धी, व्यापार आणि संवादाचा कारक मानले जाते. वृश्चिक राशीतील या गोचरामुळे 5 राशींच्या लोकांना चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ: बुध वृश्चिक राशीत गेल्याने वृषभ राशीच्या व्यक्तींना सकारात्मक फळ मिळू शकते. व्यवसायात चांगला फायदा होण्याची चिन्हे असून भागीदारांसोबतचे सूर जुळतील. नातेसंबंधात गोडवा राहील आणि नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळू शकते.
मिथुन: या बदलामुळे मिथुन राशीच्या लोकांना प्रगतीचे नवे मार्ग दिसू शकतात. नोकरीत पुढे जाण्याची संधी मिळेल आणि कर्जातून (Loan) सुटका होण्याची शक्यता निर्माण होईल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते तसेच केलेल्या कष्टाचे फळ हाती येऊ शकेल.
कन्या: कन्या राशीच्या लोकांसाठी पैशाच्या बाबतीत हा काळ अनुकूल ठरु शकतो. कमाईचे नवे स्रोत मिळण्याची शक्यता आहे. माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्यांना यश मिळू शकते, व्यापाऱ्यांना लाभ होऊ शकतो आणि घरच्या सुखसोयींमध्ये वाढ होईल.
तुळ: तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत. पैशांची बाजू भक्कम राहील आणि बचत करणे सोपे जाईल. कुटुंबासोबत वेळ घालवणे फायद्याचे ठरेल, व्यवसायात वाढ होईल आणि चांगल्या काळाची सुरुवात जाणवेल.
वृश्चिक: वृश्चिक राशीतच बुधाचे गोचर होत असल्याने या राशीच्या लोकांना कामात यश मिळू शकते. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी उपलब्ध होतील आणि नोकरीत नवी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे, पण मोठा निर्णय घेताना पूर्ण विचार करा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.