खराब रस्ते, दूषित पाणी अन् बेरोजगारी; केपेतील नागरिकांनी आपच्या नेत्यांसमोर मांडल्या समस्या

Quepem Road Water Problems: ‘महागाई मुक्ती यात्रे’च्या दुसऱ्या दिवशी आपच्या नेत्यांनी केपे मतदारसंघात घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला.
Quepem Road Water Problems
Water ProblemsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

केपे: खराब रस्ते, अपुरा व दूषित पाणीपुरवठा आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधींचा अभाव, अशा विविध समस्यांचा पाढा केपेतील नागरिकांनी आम आदमी पार्टीच्या नेत्यांसमोर मांडला.

‘महागाई मुक्ती यात्रे’च्या दुसऱ्या दिवशी आपच्या नेत्यांनी केपे मतदारसंघात घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. केपे येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या असून, त्याचा व्यवसाय आणि घरखर्चावर होणारा परिणाम याविषयी महिलांनी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. यावेळी मंदिराबाहेर फुलविक्री करणाऱ्या महिलांशीही संवाद साधण्यात आला.

Quepem Road Water Problems
ABVP Goa University Election: गोवा विद्यापीठात अभाविपचा क्लीन स्वीप; सर्व 9 जागांवर विजय, एनएसयूआयचा धुव्वा

प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी प्रत्येक कुटुंबासाठी दरमहा एक लाख रुपयांच्या लाभाची पक्षाची हमी असल्याचे सांगितले. यामध्ये मोफत वीज, महिलांना दरमहा तीन हजार रुपयांची आर्थिक मदत आणि मोफत बस प्रवासाचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ उपाध्यक्ष संदेश तेलेकर देसाई, राजेश गावकर, प्रशांत नाईक, अमित जोग, पॅट्रिशिया फर्नांडिस, गितेश नाईक, निश कुतिन्हो यांनी संवाद साधला.

१९ डिसेंबरपर्यंत यात्रा

दिवसभराच्या कार्यक्रमाची सांगता केपे येथे आयोजित ‘लोकांचो एकवोट’ या सार्वजनिक सभेने झाली. ‘महागाई मुक्ती यात्रा’ १९ डिसेंबरपर्यंत संपूर्ण गोव्यात सुरू राहणार आहे. महागाई आणि भ्रष्टाचारमुक्त गोव्याच्या निर्मितीसाठी गोमंतकीयांनी या यात्रेत सहभागी व्हावे आणि वाढत्या महागाईबाबत सरकारला जाब विचारावा, असे आवाहन आम आदमी पार्टीतर्फे करण्यात आले आहे.

Quepem Road Water Problems
One Goa Project Stay: कारापूरमधील 'लोढा' प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; बांधकामासह परवानग्यांना स्थगिती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.