Goa Excise Department Seizes Liquor Dainik Gomantak
गोवा

Goa Liquor Seized: सांकवाळ येथून 1.34 कोटींचा मद्य साठा जप्त, महाराष्ट्र कनेक्शन समोर

Goa Excise Department Seizes Liquor: सांकवाळ आयडीसीच्या पार्किंग परिसरात दोन ट्रक मद्यसाठा जप्त करण्यात आला. सुमारे १.३४ कोटीचे मद्य अबकारी खात्याने ताब्यात घेतले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Liquor Seized Sancoale News

वास्को: सांकवाळ आयडीसीच्या पार्किंग परिसरात दोन ट्रक मद्यसाठा जप्त करण्यात आला. सुमारे १.३४ कोटीचे मद्य अबकारी खात्याने ताब्यात घेतले. दोन्ही वाहने मंगळवारपासून एकाच जागेवर होती.

वास्को उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी सांकवाळ आयडीसीच्या पार्किंगमधून रू. १.३४ कोटी रुपयांच्या अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) उत्पादित केलेली ही दारू बेकायदेशीरपणे साठवली जात होती आणि गोव्यात अनधिकृतपणे वाटप करण्याच्या हेतूने ठेवलेली होती. एका ट्रकमधून ७० लाख रुपयांची तर दुसऱ्या ट्रक मधून ६४ लाख रुपयांची मिळून १.३४ कोटी रुपयांची भारतीय बनावटीची विदेशी मद्य (आयएमएफएल) जप्त करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी, मडगावातून कर्नाटकात (Karnataka) मद्याची वाहतूक करणारा ट्रक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी रोखून कारवाई केली. ट्रकमधून तब्बल 36 लाखांचे अवैध मद्य जप्त केले. याप्रकरणी दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. मडगावातून कर्नाटकात अवैध पद्धतीने मद्याची वाहतूक केली जात होती.

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी संशयित ट्रकची तपासणी केली असता अवैध मद्यसाठा आढळून आला. ट्रकातून 72 हजार मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याची किंमत 36 लाख रुपये असल्याचे सांगितले गेले. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Track Doubling: 'विरोध करण्याची धमक भाजप सरकारात नाही'! रेल्वेमार्गावरून 'आप'चा घणाघात; चेहऱ्यावर काळे पट्टे ओढून विरोध

Goa Rain: मुसळधार पाऊस पडणार! 'ऑरेंज अलर्ट' जारी; सांगे, धारबांदोडयात दीडशतक पार

Goa Population: गोव्याची लोकसंख्या होणार 17 लाख! सरकारी यंत्रणेचा अंदाज; जनगणनेची पूर्वतयारी सुरू

Goa: ‘फलोत्पादना’मुळे भाजी उत्‍पादकांना पावले गणराय! 5 दिवसांत कमावले 23 लाख; महामंडळाकडून 1.22 कोटींची उलाढाल

Goa Railway Project: 'गोवा कोल हब बनणार नाही...'; रेल्वे दुहेरीकरणावरुन मुख्यमंत्री सावंत यांची ग्वाही, पण वाद कायम

SCROLL FOR NEXT