Lavoo Mamledar Dainik Gomantak
गोवा

Lavoo Mamledar Death: माजी आमदार लवू मामलेदार मृत्यू प्रकरण; रिक्षा चालकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी!

Goa Ex MLA Death: बेळगाव न्यायालयाने रिक्षाचालक अमीरसुहिल शकीलसाब सनदीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

Akshata Chhatre

पणजी: रिक्षाला कार घासल्याने संतप्त रिक्षाचालकाने फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांच्यावर हात उचलला. दिवंगत लवू आणि बेळगाव येथील स्थानिक रिक्षाचालकाच्या वादानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. शनिवारी (दि. १५) रोजी बेळगावातील खडेबाजरात हा प्रकार घडला होता. याप्रकरणात माजी आमदार लवू मामलेदार यांच्या मृत्यूप्रकरणी सनदीला अटक करण्यात आली होती आणि सुनावणीनंतर बेळगाव न्यायालयाने रिक्षाचालक अमीरसुहिल शकीलसाब सनदीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

माजी आमदार लवू मामलेदार यांची बेळगावमध्ये ये-जा असायची. त्यांची मुलं बेळगावमध्ये शिकायला आहेत आणि म्हणूनच यावेळी देखील लवू बेळगावमध्ये गेले होते. दरम्यान अनावधानाने त्यांची गाडी एका रिक्षेला लागली आणि रिक्षाचालकाने संतापून माजी आमदारांवर वार केला.

श्रीनिवास लॉजचे कर्मचारी अडिवेप्पा करलिंगन्ना यांनी दिलेल्या माहितीनुसार लवू मामलेदार हे त्यांच्या श्रीनिवास लॉजचे नियमित ग्राहक होते. अनेकवेळा सांगून देखील रिक्षावाला ऐकायला तयार नव्हता आणि शेवटी लॉजच्या कारभाऱ्यांनी लवू यांना सुरक्षित लॉजमध्ये आणले होते.

मुख्यमंत्री सावंतांनी व्यक्त केला शोक!

दिवंगत आमदार लवू मामलेदार यांच्या स्मृतींना उजाळा देताना मुख्यमंत्री म्हणाले की, यांनी पोलिस सेवेत असताना राज्याच्या सुरक्षिततेसाठी मोठं योगदान दिलं होतं. त्यानंतर राजकारणात प्रवेश करून त्यांनी जनतेच्या सेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या अशा दुर्दैवी जाण्यानं एक तळमळीचा नेता आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी हरपला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT