Lavoo Mamledar: आठवांचा गहिवर, अश्रू अनावर! लवू मामलेदार अनंतात विलीन; फोंड्यात अंत्यसंस्कार

Former MLA Lavoo Mamledar Last Rites In Ponda: फोंडयाचे माजी आमदार तथा माजी पोलिस उपअधीक्षक लवू मामलेदार यांना आज (16 फेब्रुवारी) दुर्गाभाट फोंडा येथील स्मशानभूमीत शेकडो लोकांच्या उपस्थितीत साबुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.
Former MLA Lavoo Mamledar Last Rites In Ponda:
Former MLA Lavoo MamledarDainik Gomantak
Published on
Updated on

Former MLA Lavoo Mamledar Last Rites In Ponda

फोंडा: फोंडयाचे माजी आमदार तथा माजी पोलिस उपअधीक्षक लबू मामलेदार यांना आज (16 फेब्रुवारी) दुर्गाभाट फोंडा येथील स्मशानभूमीत शेकडो लोकांच्या उपस्थितीत साबुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. लवू मामलेदार यांचे कनिष्ठ बंधू श्रीहरी मामलेदार यांनी भडाग्नी दिला. यावेळी लवू मामलेदार यांच्या दोन्ही कन्या उपस्थित होत्या.

बेळगाव येथे एका कॅबचालकाशी झालेल्या वादानंतर झालेल्या मारहाणीत लवू मामलेदार यांचा मृत्यू झाला. त्यानंतर बेळगाव जिल्हा इस्पितळात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे पार्थिव शनिवारी रात्री उशिरा फोंड्यात आणण्यात आले, फोंडा दुर्गाभाट येथे लवू मामलेदार यांच्या पार्थिवाला भडाग्नी देण्यात आला.

Former MLA Lavoo Mamledar Last Rites In Ponda:
Lavoo Mamledar: 2012 सालच्या निवडणुकीत 'जायंट किलर’ ठरलेले लवू मामलेदार! निःस्पृह राजकारणी

आयडी जिल्हा इस्पितळातील शवागारात मामलेदार यांचे पार्थिव ठेवले होते. आज सकाळी लवू मामलेदार यांचे पार्थिव त्यांच्या दुर्गाभाट फोडा येथील मूळ निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सकाळी अंत्यदर्शनासाठी लोकांची रिघ लागली होती.

कृषिमंत्री रवी नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar), मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, आमदार दिगंबर कामत, विजय सरदेसाई, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, जेनिफर मोन्सेरात, माजी मंत्री महादेव नाईक, माजी आमदार नरेश सावळ, भाजप प्रदेशाध्यक्ष दाम् नाईक, ओबीसी आयोग अध्यक्ष अँड. मनोहर आडपर्वकर, माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, नगराध्यक्ष आनंद नाईक, गिरीश चोडणकर, राजेश वेरेकर, डॉ. केतन भाटीकर तसेच नगरसेवक पंचायत सदस्य जिल्हा पंचायत सदस्य आणि विविध स्तरांतील मान्यवरांनी मामलेदार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. फोंडा तसेच इतर ठिकाणच्या अनेक चाहत्यांनी यावेळी उपस्थिती लावली होती.

Former MLA Lavoo Mamledar Last Rites In Ponda:
Lavoo Mamledar Death: ..आणि रिसेप्शन काऊंटरसमोर ते कोसळले! माजी आमदार लवू मामलेदारांसोबत नेमके काय घडले? वाचा घटनाक्रम

सुदिन ढवळीकरांना अश्रू अनावर

ढवळीकर एकेकाळवे लवू मामलेदार यांचे शालेय मित्र तथा मगी पक्षाचे नेते वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांना अश्रू अनावर झाले. लवू मामलेदार यांना फोंड्यातून मत्रो पक्षाचे उमेदवारी सुदिन ढवळीकर यांनी लवू मामलेदार यांना दिली होती आणि निवडून येऊन लवू मामलेदार यांनी सुदिन ढवळीकर यांचा विश्वास सार्थ ठरवला होता. लवू मामलेदारांच्या स्मृतींना उजाळा देताना सुदिन ढवळीकर यांना अश्रू अनावर झाले आणि उपस्थित असलेले लोकही गहिवरले.

Former MLA Lavoo Mamledar Last Rites In Ponda:
Lavoo Mamledar: न पटल्यावर ताठ मानेने बैठकीचा निरोप घेणारे 'लवू'! राजकारणात परतण्याचे स्‍वप्‍न राहिले अधुरेच

माजी आमदार लवू मामलेदार यांची मुलं बेळगाव येथे शिकरा असल्याने त्यांची सतत तिथे ये-जा असायची कर्नाटक सरकारने यावर ठोस कारवाई केलीच पाहिजे. कारण मृत व्यक्ती ही गोव्यातील माजी आमदार आहेत. अशी गुंडगिरी सुरू राहिली, तर गोव्यातील (Goa) लोकांसाठी बेळगावमध्ये जाणं कठीण होईल - रवी नाईक, कृषिमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com