Lavoo Mamledar Death: माजी आमदार मामलेदार मृत्यू प्रकरणाच्या तपासावर गोवा सरकारचा वॉच, मुख्यमंत्री सावंतांनी घेतली दखल

Former Goa MLA Lavoo Mamledar: गोव्यातील माजी आमदार लवू मामलेदार यांचा शनिवारी (दि. १५ फेब्रुवारी) रोजी बेळगाव येथे मृत्यू झाला.
Pramod Sawant on Lavoo Mamledar Death
Pramod Sawant on Lavoo Mamledar DeathDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant Reaction on Lavoo Mamledar Death

पणजी: गोव्यातील माजी आमदार लवू मामलेदार यांचा शनिवारी (दि. १५ फेब्रुवारी) रोजी बेळगाव येथे मृत्यू झाला. त्यांच्या अचानक निधनानं राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीनं प्रतिक्रिया देत शोक व्यक्त केला.

माजी आमदार आणि गोवा पोलीस दलातील माजी अधिकारी लवू मामलेदार यांच्या आज बेळगाव येथे झालेल्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या जाण्यानं एक तळमळीचा नेता आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी हरपल्याची भावना प्रमोद सावंत यांनी व्यक्त केलीय.

लवू मामलेदार यांनी पोलिस सेवेत असताना राज्याच्या सुरक्षिततेसाठी मोठं योगदान दिलं होतं. त्यानंतर राजकारणात प्रवेश करून त्यांनी जनतेच्या सेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील, असं प्रमोद सावंत म्हणालेत.

Pramod Sawant on Lavoo Mamledar Death
Goa Party Destination: म्युझिक, मस्ती, रोषणाई... नाईट पार्टी लव्हर्ससाठी परफेक्ट डेस्टिनेशन म्हणजे गोवा

सखोल चौकशी होणार

लवू मामलेदार यांच्या मृत्यूच्या घटनेच्या सखोल चौकशीसाठी राज्य प्रशासन बेळगावातील स्थानिक अधिकाऱ्यांशी सतत समन्वय साधत असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

लवू मामलेदार यांच्या त्यांच्या निधनानं गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे.

Pramod Sawant on Lavoo Mamledar Death
Goa Travel Tips: गोव्याचा प्रवास सुरक्षित आणि मजेशीर हवा? 'या' टिप्स नक्की फॉलो करा

लवू मामलेदार यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?

बेळगावमधील एका स्थानिक रिक्षा चालकासोबत झालेल्या वादानंतर लवू अस्वस्थ झाले आणि यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती उघड झाली आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिवंगत माजी आमदार लवू मामलेदार आणि एका रिक्षा चालकामध्ये वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे.

बेळगाव येथील स्थानिक रिक्षा चालकाच्या रिक्षेला गाडीचा धक्का लागल्याने या दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता, अशी माहिती उघड झाली आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रिक्षाचालक लवू यांच्यावर हात उचलताना देखील दिसतोय. दोघांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर लावू मामलेदार पायऱ्या चढून आत देखील येताना दिसतायत. मात्र त्यानंतर त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने जागीच दुर्दैवी मरण आल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com